नांदेड l सीटू च्या वतीने नांदेड शहरातील संघर्ष कार्यालयात जयंती निमित्ताने माता जिजाऊ भोसले यांना अभिवादन करण्यात आले. सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेची जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्या बैठकीस किनवट,भोकर, कंधार,लोहा, हदगांव, अर्धापूर, मुदखेड,हिमायतनगर,भोकर, नांदेड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सुरवातीला चळवळीतील दिवंगत ज्ञात अज्ञातांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

माता जिजाऊ यांच्या जीवन पटावर संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त कले. या अभिवादन कार्यक्रमास कार्याध्यक्ष कॉ.दिगंबर काळे, सरचिटणीस कॉ. अनिल कराळे,उपाध्यक्ष कॉ. साहेबराव दहिभाते, जिल्हा उपाध्यक्षा कॉ. साधना शिंदे, कॉ. इंदुबाई डोंगरे,सहसचिव कॉ.जनार्धन काळे,मुदखेड ता.अध्यक्ष कॉ. बालाजी गऊळकर, कंधार ता. अध्यक्ष कॉ.माधव अंतापुरे, मनमथ नरंगले,शेख इक्बाल,कॉ.गणेश शिंदे, जमसं च्या जिल्हाअध्यक्षा कॉ. लता गायकवाड आदींची उपस्थिती होती.
-कॉ.गंगाधर गायकवाड
-अध्यक्ष : महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटना (CITU)
