उस्माननगर| जोशीसांगवी ता.लोहा येथील तरूण मराठा सेवक तिरुपती बाबाराव मोरे हे मुंबईला मराठा आरक्षाणासाठी रवाना झाले होते. यादरम्यान मुंबई मध्ये टेम्पोच्या अपघातात जबरदस्त जगमी व्होऊन उजव्या हाताचा दोन नसा कट झाल्या आहेत.


आरक्षण यौध्दा जरांगे पाटील यांनी सरकारला २९ ऑगस्ट पासून मुंबई येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या समर्थनार्थ संपुर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षाणासाठी (युवक) सेवक जोशीसांगवी ता.लोहा येथील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात गेले होते. मुंबईमध्ये तिरूपती बाबाराव मोरे यांच्या टेम्पोच्या झालेल्या अपघातात जबर मार लागला असून, यामध्ये उजव्या हाताचे दोन बोटं काम करत नाही.


मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या दवाखान्यात उपचार करण्यात आला असून, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, पुन्हा दुसऱ्यांदा चार महीन्यानंतर बोटांच्या नसाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मुंबईहुन उपचार करून गावाकडे परत आले असता, यावेळी बोलताना म्हणाले की, मला मार लागला. माझा हात काम करत नाही याची मला खंत वाटत नाही. मी माझ्या समाजाच्या कामासाठी उपयोगी पडलो अशी प्रतिक्रिया तिरुपती मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी मराठा सेवक विक्रम मोरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली.




