strong demand : छत्रपती संभाजीनगर उपोषण मृत्यूपंथाला –नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेद रद्द करण्याची मागणी तीव्र

मुंबई| नर्सिंग क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या लिंगभेदी धोरणाच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्यावतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषण सुरू आहे.

या उपोषणात समिती पदाधिकारी सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे, शंकर नाईकनवरे व नर्सिंग विद्यार्थी सहभागी आहेत. उपोषणकर्त्यांची तब्येत आता गंभीर स्वरूपात खालावत असून उलट्या, ताप, अशक्तपणा जाणवत आहे. तरीही प्रशासनाची धक्कादायक भूमिका अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतानाही वैद्यकीय टीम तपासणीसाठी उपस्थित नव्हती.

नांदेड जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात समितीने स्पष्ट मागण्या मांडल्या आहेत. यात नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेदी नियम तात्काळ रद्द करावा. संबंधित विभागाची बैठक बोलावून स्त्री-पुरुष लिंगभेदी नियम रद्द करावा. जर शासनाने त्वरीत निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल.

समितीचा ठाम निर्धार- नर्सिंग क्षेत्रामध्ये लिंगभेद रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,जीव गेला तरी चालेल, पण नर्सिंग क्षेत्रामध्ये समानता प्रस्थापित झालीच पाहिजे,शासनाने दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम भयंकर होतील, महाराष्ट्र पेटेल असे मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्राचे समन्वयक आदी बनसोडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button