HomeनांदेडHeavy rains in Biloli : बिलोली तालुक्यात अतिवृष्टी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार...

Heavy rains in Biloli : बिलोली तालुक्यात अतिवृष्टी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी – शंकर महाजन

नांदेड | बिलोली तालुक्यात १८ ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे लेढी नंदीचे पाणी आणि तेलंगणातील निझामसागर धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याने मांजरा नदीला प्रचंड पूर आला. या पुरामुळे नंदीपाडा शेजारील सगरोळी, बोळेगाव, गंजगाव, येसगी, कार्ला, माचनूर, हुनगुडा, नागणी तसेच इतर गावांची हजारो हेक्टर शेती तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे.

या भीषण परिस्थितीत शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढावले असून, अशा शेतकऱ्यांना त्वरीत पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यांनी केली आहे.

IMG 20250819 WA0011 Heavy rains in Biloli : बिलोली तालुक्यात अतिवृष्टी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी – शंकर महाजन

महाजन यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजना भरलेल्या शेतकऱ्यांचे दावे तत्काळ मंजूर करण्याचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत, अशीही मागणी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments