Vehicle owners are suffering due to the poor condition of Phulenagar-Adarshgaon Tembhi roads हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील आमराई पासुन शहरांतर्गत असलेल्या फुलेनगर ते आदर्श गाव टेंभी रस्त्यांची पुर्णतः चाळणी झाली आहे. ठिकठिकाणी गुडघ्याच्यावर खडे पडल्यामुळे आटो, चार चाकी वाहनाच्या पाट्या तुटून नुकसान होत आहे. परिणामी अनेक प्रवाशांचे कंबरडे मोडले असुन, अनेकांच्या नसा दबल्याने स्पॉंडिलाइटीज सारख्या आजाराचा सामना करावा लागतो आहे. रस्त्याच्या दुर्दक्षेकडे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्ष पणामुळे तिवृ संताप व्यक्त केला जात आहे.


हिमायतनगर शहरापासून रेल्वे अंडरब्रिज पार्डी रस्त्यापासुन पुढे फुलेनगर ते आदर्श गाव टेंभी पर्यंतच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी गुडघ्याच्या वर खडे पडल्यामुळे प्रवाशांसह चालक नागरीकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. फुलेनगर ही वस्ती हिमायतनगर नगरपचायत अंतर्गत येत असुन दैनंदिन कामकाजासाठी येथील रहिवाशांना दररोज हिमायतनगर ला यावे जावे लागते.

टेंभी -आदेगाव-पवना-दरेसरसम या गावांना जाणारा हा जवळचा मार्ग आहे रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे अनेकांना झालेल्या आजारातुन उपचारासाठी थेट नांदेड गाठावे लागले आहे. वयोवृध्दासह गरोदर मातेना नको त्या त्रासाचा दररोज सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधीने किमान खड्डे बुजवून प्रवाशी, नागरिक वाहन चालकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे.

नगरपचायत अंतर्गत येत असलेला एक वार्ड या रस्त्यावर असुन उर्वरीत गावे जिल्हा परिषद सरसम -सवना गटात येतात. खड्डेमय रस्त्याकडे लक्ष न दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचारार्थ येणाऱ्या पुढा-याना जाब विचारणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्ता नाही झाला तर एक वेळ झालेली चुक पुन्हा या भागातील नागरीक होऊ देणार नाहित असा टोलाही काही जणांनी व्यक्त केला.
