Marathwada Mukti Sangram Jagar : मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा नांदेड येथील महात्मा गांधी पुतळा समोर समारोप -NNL

नांदेड। राज्य मराठी पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड.यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा समारोप नांदेड येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी विचारमंच आणि राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोंबर 2024 हा मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील समाधी स्थळापासून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी निवृत्त सैनिक संतोष लोखंडे यांचा महात्मा गांधी पुतळ्यासमोर सन्मान करण्यात आला.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ऍड.धोंडीबाराव पवार, डॉ. शिवदास हमंद, ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, राजकुमार बिर्ला यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. 3 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आणि चार तारखेला पत्रकार पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम आयोजित केल्याचे या कार्यक्रमास मराठवाडा मुक्ती चळवळी बाबत स्वाराष्ट्र असलेल्या नागरिकांनी आणि पत्रकाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे डॉ. अनिल शिरसाठ,राजकुमार बिर्ला यांनी कळविले. त्यावेळी प्रदीप जैन, नीरज अवस्थी, प्रसाद देशपांडे, संदीप महाजन यांची उपस्थिती होती

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button