Chief Minister’s Beloved Sister Yojana : इस्लापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक मेळावा संपन्न -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| गरीबातील गरीब महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणीला आर्थिक मदत मिळावी व स्वतःच्या पायावर प्रबळ व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे. आम्ही इथे कुठे राजकारण करत नाही मात्र विरोधक ही योजना फसवी आहे असे म्हणत महिलांना दिशाभूल करत आहेत.

कुठल्याही सरकारने एखादी योजना अमलात आणली असेल ती योजना कधीही बंद पडत नाही. त्यासाठी महिलांनी कुठल्याही भुलथापाला किंवा दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंद करून घ्यावी. आपले कागदपत्र सबंधीत अंगणवाडी सेविका कडे जमा करावे जर काही अडचण आल्यास संबंधित अंगणवाडी सेविका सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक व्यासपीठावरून बोलताना केले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना संवाद बैठकीचे आयोजन महिला व बालविकास विभाग किनवट च्या वतीने इस्लापूर व सावरगाव येथे करण्यात आले होते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक मेळाव्याला किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे. किनवटच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड,भाजपा किनवट माहुर विधानसभा प्रमुख, बाबूराव केंद्रे,भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी अलेवार,किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, भाजपाचे वैजनाथ कुरपडे पाटील,राजु घोगरे पाटील हुडीकर, काशिनाथ शिंदे,तुकाराम बोनगीर,दत्ता आडे, सुर्यकांत बोधनकर,प्रकाश दंडे, पांडुरंग जाधव, विष्णू राठोड इस्लापूर येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे उपसरपंच प्रतिनीधी बालाजी दूरपडे पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका एन एच सरकलवाड, योजना जाधव,घुमे जे बी कदम पि बी,राठोड एस के, वाघमारे व्हि एक, श्रीसांगर वी बी, बैनवाड एस जी, पोले सी जी,स्वामी व्हि एम, सुरगळीकर एस एस, यांच्यासह अनेक पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक मेळाव्या दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महत्वकांक्षी योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सवांद बैठक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार भिमराव केराम यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक मेळाव्याला इस्लापूर व जलधरा जिल्हा परिषद गटाततून सर्वंच अंगणवाड्या सेवीका कार्यकर्त्या व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button