नवीन नांदेड l भारतीय राज्यघटनेस पंचाहत्तर वर्षे पूर्ण होवून या प्रजासत्ताक दिनी शहात्तरावे वर्ष पूर्ण झाले. जगातील लोकशाही देशामध्ये भारतीय लोकशाही अबाधित ठेवण्याचे बहुमूल्य योगदान भारतीय संविधानाने केले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयांच्या उर्जेचा स्त्रोत आहे.

या स्त्रोतास घरोघरी पोहचविण्यासाठी आणि संविधान प्रत्येक घरात असावे म्हणून विष्णुपूरी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे यांनी या प्रजासत्ताक दिनी मान्यवरांसह सामान्यजनास सुध्दा राज्यघटनेची प्रत स्व-खर्चातून भेट म्हणून प्रदान केली आहे. या संविधान वितरण कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ मनेश बी.कोकरे,संचालकएस.जी.एस.अभियांत्रिकी महाविद्यालय यांची उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .संत बाबाहरजिंदरसिंगजी, माजी आ.मोहनराव हंबर्डे,भार्गव करिअर अकँडमिचे भार्गव विजयकुमार राजे, विष्णुपूरीच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती संध्या विलासराव देशमुख हंबर्डे,उपसरपंच अर्चना हंबर्डे,डॉ संजय देठे,डॉ अभिजीत नांदेडकर, साहेबराव हंबर्डे, माणिक हंबर्डे, रामचंद्र शेंबोले,माजी सरपंच के.डी.देशमुख,बाबाराव हंबर्डे, केशव ठाकूर विश्वनाथ हंबर्डे, संतोष बारसे, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव व राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली होती. सुरुवातीस विलास हंबर्डे यांनी संविधानाचे महत्त्व विशद करुन उपस्थितांना राज्यघटनेची प्रत देवून सन्मान केला.

यावेळी डॉ कोकरे यांनी संविधान निर्मिती प्रक्रियेची उपयुक्त माहिती देत संविधानाची आवश्यकता पटवून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.खदीर यांनी केले तर आभार उज्ज्वला जाधव यांनी व्यक्त केले. राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचा योग साधत हा अभिनव उपक्रम राबविल्याबाबत विलास हंबर्डे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
