Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| “जय जिजाऊ, जय शिवराय” या गर्जनेसह हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुन्नाभाऊ शिंदे व बालाजी ढोणे हे १७ फेब्रुवारीपासून हिमायतनगर नगरपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार हिमायतनगर यांना निवेदणाद्वारे सांगितले की, मागील प्रशासक राजवटीत याच मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी नगरपंचायत प्रशासनाने निवडणूक पार पडल्यानंतर पहिल्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मंजूर करण्याचा ठराव केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, नगरपंचायतीची निवडणूक होऊनही अद्याप पुतळ्यासाठी जागा देण्याची ठोस भूमिका प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Oplus_16908288

लेखी आश्वासन असूनही निर्णय प्रलंबित ठेवल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे जागा मंजूर होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दिनांक १७ फेब्रुवारीपासून नगरपंचायतीसमोर होणाऱ्या आमरण उपोषणामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागतो का, की आंदोलन अधिक तीव्र होते, याकडे संपूर्ण हिमायतनगर शहराचे लक्ष लागले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button