only Veerashaiva Lingayat Samaj candidate : विधानसभा निवडणूकीत सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या – NNL
मुंबई| आगामी विधानसभा निवडणूक -२०२४ लक्षात घेता आपल्याला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघातर्फे सर्वच राजकीय पक्षांकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही वीरशैव लिंगायत समाजाला विद्यमान सरकारने वाटाण्याच्या अक्षता दिल्यात व सर्वच निवेदनांना केराची टोपली दाखवली त्यामुळे फक्त वीरशैव लिंगायत समाजाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे असतील त्यांना मतदान करावे असे आवाहन डॉ. विजय जंगम यांनी केले आहे.
आचारसंहीता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारने जवळपास ८० पेक्षा जास्त शासननिर्णय लागू केलेत मात्र यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या एकाही मागणीचा विचार केला गेला नाही. सुरुवातीपासूनच अ भा वी लिं महासंघाची स्पष्ट व ठाम भूमिका आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठींबा देता येणार नाही. समाजाला गृहीत धरुन एकगठ्टा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही, ही गोष्ट महासंघाच्या सर्वच पदाधिकार...









