हिमायतनगर, अनिल मादसवार| निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर कुणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात वंचित बहुजन आघाडीने प्रथम स्थान मिळविले आहे. हिमायतनगरचे भूमिपुत्र असलेल्या बंजारा समाजातील उच्चशिक्षित असलेले दिलीप राठोड यांना वंचितने उमेदवारी घोषीत केली आहे.


वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी दिलीप राठोड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रविवारी रात्री पहिल्यांदा हिमायतनगर शहरात त्यांचा आगमन झालं. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी फटाक्याच्या अतिशबाजीत त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं. दिलीप राठोड यांनी प्रथमतः हिमायतनगर शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच आंबेडकर चौकात असलेल्या नालंदा बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आभिवादन करून जनसमुदायाच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिलीप राठोड तुम आगे बढो…. हम तुम्हारे साथ है… वंचित बहुजन आघाडीचा विजय असो… अश्या घोषणा देत वंचितचे उमेदवार तथा भावी आमदार दिलीप राठोड यांची खांद्यावर उचलून मिरवणूक काढली यावेळी ठिकठिकाणच्या चौकात फटाक्याच्या आतिषबाजी आणि पुलांचे हार गुच्छ देऊन जंगी स्वागत झालं.

वंचितचे उमेदवार दिलीप राठोड यांनी सिप्रा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मतदार संघातील ग्रामीण भागातील महिला बचतगट सह विविध सामाजिक प्रश्न घेवून आंदोलने केली आहेत. ओबीसी आरक्षण बचाव चळवळीत त्यांनी हिमायतनगर, हदगाव तालुक्यात मोठा संघटन उभं केलं असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले होते. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच घाम फोडून ओबीसी, वंचित अठरा पगड जातीच्या मतदार बांधवांच्या आशीर्वादाने विजयी होतील असा विश्वास त्यांच्यासह समर्थकांनी व्यक्त केला आहे.

अश्याच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नांदेड न्यूज लाईव्हच्या युट्यूब चैनेलला सबस्क्राईब करा… धन्यवाद
