भोकर| भाजपच्या पहिल्या यादीत भोकर विधानसभेची उमेदवारी श्रीजया अशोक चव्हाण यांना जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिशय बाजी करून जल्लोष साजरा केला आहे. महायुतीचे महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गणेश पाटील कापसे,किशोर पाटील लगळूदकर,जगदीश पाटील भोशीकर, राजेश देशमुख, आनंद डांगे,युसूफ शेख, गणेश राठोड,केशव पाटील गौतम कसबे, सुनील शाह,डॉ. मनोज गिमेकर,वेणू कोंडलवार, बाळू माने,सुलोचना ढोले,विठ्ठल धोंडगे, ऋषिकेश स्वामी,गोविंद मेटकर,राजू सोनवडे,मिर्झा ताहेर बेग यांच्या सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, इच्छुक उमेदवार आपापल्या पार्टीकडे उमेदवारी मागण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करित आहेत तर कित्येक पार्ट्यात डझन भर मलाच उमेदवारी मुळेल या आशेने मुबंई वाऱ्या करित आहेत तर काहीजण तेथे उबरठे झीजवत असल्याचे समजते. त्यातच आज दुपारी भारतीय जाणता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी एक ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्या यादीत नांदेड जिल्ह्यातील चार उमेदवारांचा समावेश असून ज्या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
अतिशय महत्वाचा समाजाला जाणारा भोकर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची सुकन्या श्रीजया चव्हाण यांच्या नाव पहिल्या यादीत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फाटक्याची अतिशबाजी करीत जल्लोष साजरा केला. महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देत महायुतीचे सर्व घटकपक्ष तन, मन, धनाने कार्य करून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला. व अनेकांनी अशा स्वरूपाच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या.