नांदेड| नांदेडमधून एक महत्वाची बातमी हाती आली आहे, देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपला जय श्रीराम करत तिसरी आघाडी म्हणजे ‘परिवर्तन महाशक्ती’ मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, संतोष भाऊ हंबर्डे व समविचारी नेते उपस्थित होते. आमदार जितेश अंतपुरकर यांच्या भाजप प्रवेशाने उमेदवारी मिळण्याच्या कोंडीवरून माजी आमदार सुभाष साबणे यांनी 19 अक्टोबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह सर्व पदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते, मागील चार निवडणुकीत सुभाष साबणे हे तीन वेळा शिवसेनेकडून तर एक वेळा भाजपकडून उमेदवार राहिलेले सुभाष साबणे हे एकदा विजयी झाले होते तर तीन वेळा पराभूत झाले होते यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला आहे.
अश्याच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नांदेड न्यूज लाईव्हच्या युट्यूब चैनेलला सबस्क्राईब करा… धन्यवाद