श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी किनवट माहूर मतदार संघातून विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे स्पष्ट होताच किनवट-माहूर मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला आहे.
किनवट-माहूरमतदारसंघातून महायुतील भाजपा पक्षासह घटक पक्षातील अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे रेटून प्रयत्न केला त्यात शिंदे गटाकडून ही मोठी रस्सीखेच चालू असल्याची चर्चा होती. परंतु विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी उमेदवारी मिळविण्यात अखेर यश मिळवले आहे.
प्रचाराला कमी कालावधी असल्याणे लवकरच आता प्रचाराची रणधुमाळी चालू होणार असून जनतेचा कल कोणाकडे राहणार आहे. काही दिवसातच समजेल.अशातच महाविकास आघाडीने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसून यामध्ये माजी आमदार प्रदीप नाईक व उबाठाचे ज्योतिबा खराटे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून महाविकास आघाडी माञ उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार याकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे.