नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानकात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (एमएसएसीएस) मुंबई व जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कलापथकाच्या माध्यमातून एड्स जनजागृती करण्यात आली.
जिल्हा साधन व्यक्ती प्रकाश झिंझाडे, प्रकल्प व्यवस्थापक सोपान ईबिते, समुपदेशक गजानन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथक प्रमुख अरविंद खंदारे, मास्टर ईरबा गाडेगावकर आणि त्यांच्या कला संचाने एड्स म्हणजे काय? मानवी शरीरातील संपादित रोग लक्षणांचा समूह म्हणजेच एड्स होय, असे त्यांनी आपल्या कला पथकाच्या जनजागृतीतून उद्बोधन केले. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ते आपल्या भाषणात म्हणाले की, कलापथक हे आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात भरकटत जाणार्या घटकांना योग्य दिशा देण्याचे कार्य आपल्या कलेच्या माध्यमातून प्रबोधन करुन समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम ते करतात, ही अभिमानास्पद बाब असून ही काळाची गरज असल्याचे ते प्रतिपादन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकल्प व्यवस्थापक सोपान ईबिते, जिल्हा साधन व्यक्ती तथा मार्गदर्शक प्रकाश झिंझाडे, समुपदेशक गजानन ढेरे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे सुमीत सुर्यवंशी, शिवशंकर कदम, सौ. रत्नमाला पंडीत, मीरा अंकुश केंद्रे, पुजा शिंदे, शिवाजी रेणके, रविशंकर सोमेवार, कलापथक प्रमुख अरविंद खंदारे, मास्टर ईरबा गाडेगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बसस्थानकातील प्रवाशी बंधु- भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमास प्रतिसाद दिला.