हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून हिमायतनगरचे भूमिपुत्र दिलीप राठोड यांना घोषीत झाली आहे.
आचार सहिंता लागू झाल्यानंतर विविध पक्षाचे ईच्छूक उमेदवार तिकीटासाठी फिल्डींग लावून होते. वंचित बहुजन आघाडीकडून हदगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी चार जण इच्छुक होते. त्यामुळे वंचितची उमेदवारी कोणाला मिळेल हे गुलदस्त्यात होते. दरम्यान वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी दिलीप राठोड यांना उमेदवारीची घोषणा केली आहे. वंचितचे उमेदवार दिलीप राठोड हे हिमायतनगर तालुक्यातील मौजे दरेसरसम येथील रहावाशी असून, यांच शिक्षण बी. काॅम., एम.एस.डब्लू. पर्यतचे झाले आहे.
सिप्रा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हिमायतनगर तालुक्यात महिला बचतगट, विविध प्रश्न घेवून आंदोलने केली आहेत. ओबीसी आरक्षण बचाव चळवळीत त्यांनी हिमायतनगर, हदगाव तालुक्यात मोठा संघटन उभं केलं असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिले आहे. दलित, वंचित, आदिवासी ,ओबीसी, चेहरा म्हणून त्यांना नागरिक ओळखतात. एड प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी बचाव संवाद याञेत मोठा सहभाग होता. ते उच्चशिक्षित अभ्यासू, जनतेच्या प्रश्नाची जान असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर होणे बाकी असताना वंचितने आपला पत्ता उघड केल्याने दिलीप राठोड यांना अनेक कार्यकर्ते भेटून शूभेच्छा देत आहेत.
आता हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात कोणत्या पक्षाला जागा सुटून उमेदवारी कोणाला दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीत तिकिटासाठी रस्सीखेच सुरु असून, महायुतीतही तिकिटासाठी ओढाताण होत आहे. त्यामुळे अन्य पक्षाचे तिकीट कोणाला जाहिर होते याकडे तालुक्यातील जनतेचे व कार्यकर्त्याचे लक्ष लागून आहे.