Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शनन – NNL

Bhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शनन – NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। किनवट / माहूर विधानसभेसाठी पुन्हा भाजपने या भागाचे विद्यमान आमदार भिमराव केराम यांना दुसऱ्यांदा उमेदवारी घोषीत केली आहे. उमेदवारी घोषित झाल्या नंतर त्यांनी मंगळवार दि.२२ ऑक्टों. रोजी श्री दत्तशिखर येथील दत्त मंदिरात पूजाअर्चा करून प. पू. प.म. मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले. तसेच श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन महाआरती केली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय काण्णव यांनी त्यांचा सत्कार केला. माहुर शहरात आल्यानंतर आ. केराम यांनी श्री देवदेवेश्वर मंदिरात जाऊन दत्तात्रेय स्वामी यांचे दर्शन प.पू.प.म. मधुकरशास्त्री व कवीश्वर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे समवेत भाजपा तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, अनिल वाघमारे, पद्मा गि-हे, महीला मोर्चाच्या शहराध्यक्ष स्वाती आडे, मंगला जोशी, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, अनिल वाघमारे, नगरसेवक सागर महामुने, नं...
Bharatiya Janata Party : श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड -NNL

Bharatiya Janata Party : श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड -NNL

नांदेड, राजकीय
भोकर,गंगाधर पडवळे| होऊ घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष राजकीय कार्यकर्ते, समाजसेवक, यांना आपली ताकद वाढवण्यासाठी आपल्याकडे कसा खेचता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसून येत आहे. शहरात, गावात वजन आहे त्याच्या पाठीमागे लोक आहेत. अशांना विविध जबाबदारी देऊन कामाला लावत आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढून उमेदवार विजयी होण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी विव्ह रचना आखताना दिसून येत आहेत. त्यामुळेच की काय शहरातील एक नामांकित घराण्यातील, निष्कलंक व्यक्तिमत्व, समाजसेवक तथा जंगम समाज भूषण त्र्यंबकआप्पा पटवेकर यांचे धाकले चिरंजीव मेडिकल असोसिएशनचे तालुका पदाधिकारी श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या भोकर शहर उपाध्यक्षपदी निवड करून पुढील भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. भोकर शहरातील कोळी गल्ली येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते तरुणाईच ताईत जनसामान्...
Kalmanuri Assembly ; कळमनुरी विधानसभा संधी दिल्यास पूर्ण ताकतीने लढविणार मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर – NNL

Kalmanuri Assembly ; कळमनुरी विधानसभा संधी दिल्यास पूर्ण ताकतीने लढविणार मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर – NNL

हिंगोली, राजकीय
कळमनुरी | कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाचे युवा नेतृत्व तथा मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक बाजीराव पाटील सवंडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल्यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा अनेक समस्यांनी ग्रस्त असून नागरी सुविधांसह या मतदारसंघाचा विकासापासून कोसो दूर असा प्रवास राहिलेला आहे या मतदारसंघात सातत्याने भूमिपुत्रांवर इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देऊन या भागातील प्रतिभावान युवकांवर व राजकीय नेतृत्वावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवितानाच सांगितले की या मतदारसंघातून सातत्याने मतदारसंघाबाहेर तील व्यक्ती आमदार म्हणून निवडून येत असल्यामुळे या मतदारसंघाच्या स्थानिक लोक व लोकसम...
Nanded district ; नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी विधानसभेसाठी 4 अर्ज दाखल – NNL

Nanded district ; नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी विधानसभेसाठी 4 अर्ज दाखल – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात बुधवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी 4 अर्ज दाखल केले आहेत. भोकर येथे एकाच उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले आहेत. नऊ मतदारसंघात 253 इच्छूक अर्जदारांनी 441 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी 17 इच्छुकांनी 28 अर्जाची उचल केली आहे. काल बुधवारी जिल्ह्यामध्ये 411 अर्जांची उचल करण्यात आली होती. तथापि काल विधानसभेसाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. आज मात्र 4 अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड उत्तर मतदारसघात 41 उमेदवारांनी 67 अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात 61 इच्छूकांनी 69 अर्जाची उचल...
Election Expenditure Inspector for Legislative Assembly ; विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल – NNL

Election Expenditure Inspector for Legislative Assembly ; विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला आहे. निवडणुकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. 40 लक्ष रुपये विधानसभेसाठी तर 95 लक्ष लोकसभेसाठी खर्च मर्यादा आहे. निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी आयोगामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. निवडणुकीतील सभा, संमेलन, जेवनावळी, जाहिरातीवरील खर्च नियंत्रीत केल्या जाते. याशिवाय पैशाचे अमिष व अन्य बाबींबाबत कडक निगरानी केली जाते. निवडणूक निरीक्षकांमार्फत याबाबींची तपासणी केली जात असून ते नांदेड जिल्ह्यामध्ये याकाळात कायम रहिवाशी असतात. ए. गोविंद राज नायगाव, देगलूर, मुखेड व लोहासाठ...
Honoring youth voters  : नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने युवक मतदारांचा सन्मान -NNL

Honoring youth voters : नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने युवक मतदारांचा सन्मान -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोकशाही सक्षम करण्यासाठी युवकांनी आळस न करता प्रथम आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. अशा अनेक नवमतदार तरुणांनी यंदा प्रथमच आपले नाव मतदार यादीत नोंदवून इपिक कार्ड सुध्दा प्राप्त केले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आज नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने प्रतिभा निकेतन महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात कु.वैष्णवी वसंतकुमार साहू व गौरांक ओमप्रकाश दरक या दोन तरुण मतदारांचे कौतुक व अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर हे तर विशेष अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णी, प्रा.विजय तरोडे, लेफ्टनंट प्रा.डॉ. किशोर इंगळे, मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे, सुनील दाचावार, संजय भालके, कविता जोशी आणि सारिका आचमे उपस्थित होते. ...
Com. Arjun Ade : भव्य रॅली काढून किनवट येथे माकपने उमेदवार कॉ.अर्जुन आडे यांचा अर्ज दाखल केला -NNL

Com. Arjun Ade : भव्य रॅली काढून किनवट येथे माकपने उमेदवार कॉ.अर्जुन आडे यांचा अर्ज दाखल केला -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| माहूर - किनवट विधानसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉ. अर्जुन आडे यांचा उमेदवारी अर्ज दि.२३ ऑक्टोबर रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी मेघना कावली यांच्याकडे दाखल केला. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातून हजारो लोकांची भव्य फेरी काढण्यात आली. आणि कलावती गार्डन येथे मेळावा घेण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या वतीने राज्य कमिटीचे सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभने, उमेदवार कॉ. अर्जुन आडे, डॉ.बाबाराव डाखोरे, कॉ.विनोद गोविंदवार,कॉ.मोहन जाधव आदींची उपस्थिती होती. शहरात रॅली काढून सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम हे होते. रॅली मध्ये कॉ किशोर पवार, कॉ उज्वला पडलवार, कॉ जनार्दन काळे,कॉ प्रल्हाद चव्हाण,कॉ शिवाजी गायकवाड, कॉ.अंकुश अंबुलगेकर,कॉ. शै...
Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL

Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL

राजकीय, नांदेड
लोहा l लोहा विधानसभा मतदार संघात पहिल्‍याच दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही पण 21 जणांनी 53 नामनिर्देशन पत्र घेतले आहेत अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी दिली. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन दाखल करण्‍यास आज पासून प्रारंभ झाला आहे. दाखल करण्‍यास आज पासयून प्रारंभ झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 30 ऑक्‍टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर 4 नोंव्‍हेबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची अंतिम मुदत आहे. मतदान 20 नोंव्‍हेबर रोजी होणार आहे.स्वतंत्र कक्ष स्थापण करण्यात आला असून तेथे नामांकन खरेदी, तपासणी व स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशांचे पालन व्‍हावे. यासाठी सर्वांनी जबाबदारी पार पाडावी असे निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा सं...
Tisari aaghadi ; देगलूर विधानसभामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघात माधवराव देवसरकर यांना उमेदवारी -NNL

Tisari aaghadi ; देगलूर विधानसभामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघात माधवराव देवसरकर यांना उमेदवारी -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड/मुंबई। छत्रपती खा. संभाजीराजे, राजू शेट्टी आणि आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील तिसऱ्या आघाडीने महाराष्ट्र राज्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघामधून माधवराव देवसरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू यांनी ही आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, महायुतीमधील इतरही घटक पक्ष लवकरच यादी जाहीर करणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली असून ६६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा...
nomination form on October 24 : गुरुपादेश्वर शिवाचार्य २४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार -NNL

nomination form on October 24 : गुरुपादेश्वर शिवाचार्य २४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार -NNL

नांदेड, राजकीय, हिंगोली
वसमत/हिंगोली| विधानसभेचे बिल वाजले असून 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशक भरण्यास सुरुवात होणार आहे. अशी सूचना निवडणूक आयोगाच्या कडून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वसमत विधानसभेसाठी श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे 24 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील संत महंतांच्या उपस्थितीत नामनिर्दशन पत्र भरणारा असल्याची माहिती पत्रकाद्वारे सांगितली. वसमत विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गणला जातो सध्या या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असून या ठिकाणी जनतेचा जनाधारावर श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत ते 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत या वेळी महाराष्ट्रातील संतमहतांची उपस्थिती राहणार आहे. सध्या वसमत विधानसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावणार आहेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी विकासात्मक कामे जनतेच्य...
error: Content is protected !!