HomeनांदेडBhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे...

Bhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शनन – NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। किनवट / माहूर विधानसभेसाठी पुन्हा भाजपने या भागाचे विद्यमान आमदार भिमराव केराम यांना दुसऱ्यांदा उमेदवारी घोषीत केली आहे. उमेदवारी घोषित झाल्या नंतर त्यांनी मंगळवार दि.२२ ऑक्टों. रोजी श्री दत्तशिखर येथील दत्त मंदिरात पूजाअर्चा करून प. पू. प.म. मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले. तसेच श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन महाआरती केली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय काण्णव यांनी त्यांचा सत्कार केला.

माहुर शहरात आल्यानंतर आ. केराम यांनी श्री देवदेवेश्वर मंदिरात जाऊन दत्तात्रेय स्वामी यांचे दर्शन प.पू.प.म. मधुकरशास्त्री व कवीश्वर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे समवेत भाजपा तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, अनिल वाघमारे, पद्मा गि-हे, महीला मोर्चाच्या शहराध्यक्ष स्वाती आडे, मंगला जोशी, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, अनिल वाघमारे, नगरसेवक सागर महामुने, नंदकुमार जोशी, विनोद सुर्यवंशी, आनंद मच्छेवार, संतोष मरसकोल्हे, निळकंठ मस्के, जीवन अग्रवाल, दत्ता शेरेकर, नंदु कोलपवार, अनुदीप कोरटकर, कैलास फंड, राजू दराडे, सुरेश गि-हे, शामराव कुमरे, अशोक जोशी, बालाजी गेंटलवार, निलेश तायडे, सदानंद पुरी यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments