किनवट,परमेश्वर पेशवे| माहूर – किनवट विधानसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉ. अर्जुन आडे यांचा उमेदवारी अर्ज दि.२३ ऑक्टोबर रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी मेघना कावली यांच्याकडे दाखल केला.
यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातून हजारो लोकांची भव्य फेरी काढण्यात आली. आणि कलावती गार्डन येथे मेळावा घेण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या वतीने राज्य कमिटीचे सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभने, उमेदवार कॉ. अर्जुन आडे, डॉ.बाबाराव डाखोरे, कॉ.विनोद गोविंदवार,कॉ.मोहन जाधव आदींची उपस्थिती होती. शहरात रॅली काढून सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम हे होते.
रॅली मध्ये कॉ किशोर पवार, कॉ उज्वला पडलवार, कॉ जनार्दन काळे,कॉ प्रल्हाद चव्हाण,कॉ शिवाजी गायकवाड, कॉ.अंकुश अंबुलगेकर,कॉ. शैलीया आडे, कॉ. दिगंबर काळे,कॉ.खंडेराव कानडे, कॉ.सुभाष डाखोरे, कॉ. स्टालिन आडे, कॉ.संगीता गाभने,कॉ. लता गायकवाड, कॉ आडेलू बोनगीर यासह हजारो च्या संख्येने स्त्री पुरुष उपस्थित होते. किनवट विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार असून कॉ. अर्जुन आडे समीकरण बदलणार आहेत. अशी माहिती माकप जिल्हा कमिटी सभासद कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.