नांदेड| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत नांदेड जिल्ह्यात निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सी-व्हीजील ॲपवर तसेच 1950 या टोल फ्रि क्रमांकावर फोन करुन तक्रारी कराव्यात असे आवाहन जिल्हा सह आयुक्त नपाप्र तथा सी-व्हीजील, व्होटर हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी गंगाधर इरलोड यांनी केले आहे.
आचार संहिता भंगाच्या तक्रारीचे फिल्ड स्तरावरील एफएसटी टिम द्वारे प्राप्त तक्रारींची शहानिशा करुन तक्रार 100 मिनीटात निकाली काढण्यात येते. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरीकांनी सी-व्हीजील ॲपद्वारे जर कोणी बंदुक/पिस्तुल प्रदर्शन करणे, दारु वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्तेचे विद्रुपण, बनावट बातमी, मतदारांची वाहतुक, भेटवस्तु वाअप, पेड न्युज, जातीत तेढ निर्माण करणारे भाषण, धमकी इत्यादीबाबत प्रकार होत असल्यास अशा घटनांचे सी-व्हीजील ॲपद्वारे फोटो , व्हिडीओ तसेच ऑडीओ रेकॉर्ड करुन ऑनलाईन तक्रारी दाखल करुन शकतात.