हदगाव/हिमायतनगर| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान महायुतीची उमेदवार मिळविण्यासाठी शिंदे गट, भाजप आता त्यापाठोपाठ व्यंकटेश पाटील यांनी अजितदादाकडून राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. त्यामुळे हदगाव विधानसभेच्या तिकिटासाठी रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्वच इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होते हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभेसाठी महाविकास आघाडी बरोबर आता महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजितदादा गटातील इच्छुक उमेदवारांची जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.
येत्या दोन दिवसात महायुतीकडून हादगावची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच हादगाव तालुक्यातील उच्च शिक्षणाची युवा व्यंकटेश पाटील यांनी हादगावच्या उमेदवारीवर दावा केला असून, अजितदादा पवार गटाला हि जागा सुटणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे. एव्हढंच नाहीतर हि जागा मिळविण्यासाठी माझे अजिदादांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचं सांगितले आहे. त्यामुंळे हदगावची उमेदवारी कोणाला व कोणत्या मित्र पक्षाला सुटते..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोण आहेत व्यंकटेश पाटील तालंगकर …?
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक उच्चशिक्षित आणि अजितदादा पवार यांचा सच्चा युवा कार्यकर्ता म्हणून व्यंकटेश पाटील तालंगकर यांची ओळख आहे. हदगाव येथील एका शेतकरी कुटुंबात असून, आजोबाच मार्गदर्शन व वडिलांच्या पाबळावर पाऊल ठेऊन उच्चशिक्षण एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईमध्ये कार्पोरेट कंपनी जॉब करताना अजितदादाची भेट झाली. याच भेटीतून व्यंकटेश पाटील यांचा राजकीय प्रवास चालू झाला. व्यंकटेश पाटील यांनी अजितदादांच्या मार्फत हदगाव हिमायतनगर तालुका तसेच नांदेड जिल्हा व राज्यातील इतर लोकांसाठी काम केली.
तालुक्यातील जिल्ह्यातील काही प्रश्न जे स्थानिक आमदाराला सुद्धा सोडविता आले नाही. त्या समस्या अजितदादा मार्फत सोडविल्या. शेतकऱ्याचा प्रश्न, बचत गट अंगणवाडी यासह अनेक सामाजिक व वयक्तिक कामे कुठलेही राजकीय पाठबळ नसताना त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षात काम करत असतानाच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट होऊन 2014 नंतर शरद पवार साहेबांसोबतही व्यंकटेश पाटलांची जवळीक निर्माण झाली. पवार साहेबांच्या भेटीमध्ये हदगाव मतदार संघ तसेच नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. 2019 ला व्यंकटेश पाटलासाठी हदगाव मतदारसंघ सोडून घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुद्धा केला होता. पण दुर्दैवाने त्यांना व पक्षाला यश आले नाही.
अजितदादांचा सहवास आणि शरद पवार साहेबांच्या सहवासाने व्यंकटेश पाटील राजकीय क्षेत्रात परिपक्व व जाणकार झाले. व्यंकटेश पाटलाच्या राजकीय जीवनामध्ये या दोन व्यक्तीचा खूप मोठा प्रभाव आहे. दरम्यान 2022 नंतर अजित दादांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्थानिक परिस्थितीचा विचार करून व्यंकटेश पाटलांनी अजित दादा सोबत राहण्याचे पसंद केले. असे असले तरी आज घडीला पवार साहेबांचं आणि इतर पक्षातील नेत्यांचं प्रेम व प्रभाव कमी झाला नाही. मागील पंधरा ते वीस वर्षापासून ते हदगाव हिमायतनगर नांदेड जिल्हा तसेच राज्यातील विविध भागातून येणारे प्रश्न अजितदादा व मंत्रि मंडळातील सहकारी व राज्य सरकार मार्फत सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अजित दादाकडे हदगाव मतदार संघ हा महायुतीकडून सोडून घेण्यात यावा यासाठी आग्रह धरला असून, अभि नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे व्यंकटेश पाटील यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीला पाहता निवडणूक रिंगणात तेच ते चेहरे पाहून मतदार राजाही कंटाळून गेला असून, घराणेशाहीतील उमेदवारांना घरी बसून परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे. एकूणच मतदारांच्या निर्णयामुळे हदगावचे नेतृत्व करण्याची संधी नवतरुण युवकाला मिळेल अशी जनभावना आहे.