Hadgaon Assembly : हदगाव विधानसभा राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी व्यंकटेश पाटील यांचे अजितदादाकडून जोरदार प्रयत्न -NNL
हदगाव/हिमायतनगर| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान महायुतीची उमेदवार मिळविण्यासाठी शिंदे गट, भाजप आता त्यापाठोपाठ व्यंकटेश पाटील यांनी अजितदादाकडून राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. त्यामुळे हदगाव विधानसभेच्या तिकिटासाठी रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्वच इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होते हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभेसाठी महाविकास आघाडी बरोबर आता महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजितदादा गटातील इच्छुक उमेदवारांची जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.
येत्या दोन दिवसात महायुतीकडून हादगावची उमेदवा...
