नांदेड| नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गतच्या पथकाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंगलदार यांनी दिनांक 3 व 04 जुलै 2025 रोजी नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या इसमांवर (City Street Safety Team takes strict action against those who disturb the peace by drinking alcohol in public places) कारवाई केली आहे. भंग करणाऱ्यावर कारवाई केली आहे. या कार्यवाहीने मद्यपीमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.


1) पोलीस स्टेशन शिवाजीनगर सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चालीं क्रमांक तीन मधील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान ज्योती टॉकीज परीसरात 01 इसम हा मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्याचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.


2) पोलीस स्टेशन इतवारा सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक दोन मधील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान मॅपको रोड व जुना मोंढा परिसरात 02 इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्याचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.


3) पोलीस स्टेशन भाग्यनगर सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक एक व दोन मधील पोलीस अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान अशोक नगर परीसरात 02 इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळून आल्याने त्यांचेवर कलम 110/117 म. पो. कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीतील दारूचे दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, दारू पिणाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देवू नये व सार्वजनिक शांततेचा भंग करू नये अन्यथा संबधीत इसमांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देत शहराची शांतता कायम ठेवावी असे आवाहन केले आहे.