Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

political ‘rocket..un..tickly : लोहा कंधार “मध्ये दिवाळीत” लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब’…राजकीय ‘रॉकेट..अन..टिकल्या ‘सूरसुऱ्या’ – NNL

political ‘rocket..un..tickly : लोहा कंधार “मध्ये दिवाळीत” लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब’…राजकीय ‘रॉकेट..अन..टिकल्या ‘सूरसुऱ्या’ – NNL

नांदेड, राजकीय
लोहा| यंदाची दिवाळी तशी "राजकीय ". निवडणूकीचा काळ त्यातच लोहा कंधार मतदार संघात काँग्रेस च्या "सुतळी बॉम्ब"फुसका ठरला. निवडणूक आली की मुलाखती घेतात अन प्रचार दुसऱ्या पक्षाचा करतात.गेल्या चाळीस वर्षा पासून ",शिवसेनेचा "धनुष्य " उचलणाऱ्याना गतकाळीं आठवणीच्या "टिकल्या"वाजविण्याची वेळ यंदा आली."मोदीं है तो मुमकीन"म्हणत पाच वर्षे जिल्ह्यात 'कमळ" फुलविणारे "अजित "रॉकेट घेऊन आखाड्यात रंग "भरत आहेत.यंदाच्या दिवाळीत अनेक जण "भावीआमदार"या नावाचे ,उटणे लावून सज्ज झालेत. तशी दिवाळी "सुगी"होईल अशी "आशा"बाळगत मतदार संघात लोक "वाट पाहत आहेत. निवडणूक घेऊन यंदाची दिवाळी आली . चाळीस वर्षा पासून शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे "शिव धनुष्य "घेऊन लोहा कंधार तालुक्यात पर्यायाने जिल्हयात गावोगावी पोहचविणारे लोहेकरांचा राजकीय बॉम्ब अजून पेटलाच नाही. पक्षात एक-"नाथ " सुरसुरी वाजत आहे. काँग्रेसवाल्यानी कड घेतली आह...
Subhash Wankhede : अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांची दिवाळीनिमित्त हिमायतनगर शहरात भेट – NNL

Subhash Wankhede : अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांची दिवाळीनिमित्त हिमायतनगर शहरात भेट – NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर। हादगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार तथा आगामी निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांनी हिमायतनगर शहरात बुधवारी भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हादगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार सुभाष वानखेडे यांनी बुधवारी हिमायतनगर शहरात भेट दिली. येथील महात्मा फुले सभागृहात त्यांनी कट्टर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीती बाबत चर्चा केली. तसेच शहरातील बाजार लाईनमध्ये फिरुन नागरिक व व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुभाष वानखेडे यांच्या आगमनाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जुन्या फळीतील शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाले असून, विधानसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे....
Dr. Raviraj Dudh Kavde : डॉक्टर रविराज दूध कावडे यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड -NNL

Dr. Raviraj Dudh Kavde : डॉक्टर रविराज दूध कावडे यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| वंचित बहुजन आघाडीचे हिमायतनगर तालुक्याचा ढाण्या वाघ, भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष, तालुका संघटक इत्यादी पदावर राहून सामाजिक काम करणारे डॉक्टर रविराज दूध कावडे यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्टींने त्यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीने आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारास मोठा फायदा होणार आहे. हिमायतनगर तालुका अध्यक्ष पद गेल्यानंतरही डॉक्टर रविराज दूध कावडे यांनी पक्षावर निष्ठा ठेवून कायमस्वरूपी वंचित बहुजन आघाडी तालुक्यांमध्ये कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रित करून काम सुरु ठेवले. अविरत काम करताना ना पदाचा लोभ, ना मोठेपणाचा आव न करता बाळासाहेबांचा आदेश हीच आपल्या कामाची कार्य दिशा समजून सतत वंचित वंचित बहुजन आघाडी वाढीसाठी झटत राहिले. त्यांच्या याचा कामाची दखल पक्षश्रेष्टींने घेतली ...
Election Adjudication Officer Dr. Sachin Khalal ; निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ – NNL

Election Adjudication Officer Dr. Sachin Khalal ; निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिणचे प्रशिक्षण 26 व 27 ऑक्टोबर 2024 रोजी नागार्जुना पब्लिक स्कुल, कौठा,नांदेड येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी  असे एकूण 2 हजार 684 जणांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित होते. परंतु यापैकी मतदान केंद्राध्यक्ष 49, प्रथम मतदान अधिकारी 48 आणि इतर मतदान अधिकारी 104 असे एकूण 201 कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा सादर करण्यास चोवीस तासांचा अवधी दिला होता. आजपर्यंत मतदान केंद्राध्यक्ष 24, प्रथम मतदान अधिकारी 32 आणि इतर मतदान अधिकारी 63 असे एकूण 119 जणांनी खुलासा सादर केला आहे. अजून  82 जणांनी खुलासा सादर केला नाही. अशा 82 जणांवर तात्काळ गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे  निवडणूक न...
assembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध – NNL

assembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतर लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी तूर्तास 39 तर जिल्ह्यातील 9 विधानसभेसाठी 460 उमेदवार वैध ठरले आहेत. अंतिम फेरीतील उमेदवारांची आकडेवारी येत्या 4 नोव्हेंबरला ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 83-किनवट मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांपैकी आज 29 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 84-हदगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 66 उमेदवारांपैकी आज 63 अर्ज वैध ठरले तर 3 अर्ज अवैध ठरले. 85-भोकर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 144 उमेदवारांपैकी आज 140 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 86-नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 81 उमेदवारांपैकी आज 73 अर्ज वैध ठरले तर 8 अर्ज अवैध ठरले. 87-नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये ...
General, Expenditure and Inspectors : सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर – NNL

General, Expenditure and Inspectors : सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले असून नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटताही येणार आहे. ते सर्व नांदेड विश्रामगृहात थांबले आहेत. सामान्य निवडणूक निरीक्षक सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84-हदगाव या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. त्यांचा निवडणूक काळात संपर्क मेाबाईल क्र. 7499127265 हा आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990380 अ...
joins NCP Sharad Pawar group : भाजपाच्या माजी पंचायत समिती सभापती यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश -NNL

joins NCP Sharad Pawar group : भाजपाच्या माजी पंचायत समिती सभापती यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट पंचायत समितीच्या माजी सभापती कलाबाई नारायण राठोड व त्याचे पती माजी पं.स. सदस्य नारायण राठोड यांनी भाजपातील अंतर्गत गटबाजीला वैतागून अखेर ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात माजी आ. प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते ईश्वर जाधव यांच्या प्रयत्नाने शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत किनवट मध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. ईस्लापूर ,शिवणी परिसरातील व्यंकटराव नाईक तांडा या अतिदुर्गम भागातील गावचे रहिवासी असलेले भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नारायण मिठू राठोड यांची या भागात ओळख होती. नारायण राठोड हे गावचे उपसरपंच, इस्लापूर बाजार समितीचे संचालक, दोन वेळा शिवणी गणातून पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले ...
Loha Asembly election : सख्ख्या भावाची पाठ ; पण भाई धोंडगेचे सहकारी भाई कुरुडेंची प्रा पुरुषोत्तम याना साथ -NNL

Loha Asembly election : सख्ख्या भावाची पाठ ; पण भाई धोंडगेचे सहकारी भाई कुरुडेंची प्रा पुरुषोत्तम याना साथ -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| राजकारणात नाते दुय्यम होते आणि कोण पुढे ही स्पर्धा पुढे येते.अनेक वर्षांच्या संबंधाना तडा जातो.भाऊ भाऊ, बहीण भाऊ, चुलता- पुतण्या , बाप -लेक, अशी नाते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी राहतात. राजकारण म्हणून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.व दुरावा मात्र नात्याचा होतो.लोहा कंधार तालुक्यातील दोन मोठ्या कुटुंबात "गृहकलह"चर्चेत आहेत. भाऊ विरुद्ध बहीण-भाऊजी" अशी लढत होण्याची शक्यता असतानाच भाई धोंडगे याच्या पश्चचात त्याच्या कुटुंबातील "भाऊ"वाद चव्हाट्यावर आला आहे .सख्ख्या भावाने पाठ फिरविली पण भाई धोंडगे याना आयुष्यभर साथ देणारे त्याचे सहकारी भाई गुरुनाथराव कुरुडे हे प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या सहकार्याच्या पश्चत आधार"काठी"बनून. एक काळ राज्याच्या राजकारणात भाई केशवराव धोंडगे या नावाचा दबदबा होता. लोहा विधानसभा निवडणुक १९५२...
9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल -NNL

9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 6 दिवसात 515 इच्छुकांचे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. नऊ विधानसभा क्षेत्रापैकी किनवटमध्ये आज 10 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 31 इच्छुकांनी 45 अर्ज दाखल केले. 84-हदगावमध्ये 33 इच्छुकांनी आज 48 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 66 इच्छुकांनी 88 अर्ज दाखल केले. 85-भोकरमध्ये 76 इच्छुकांनी आज 93 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 144 इच्छुकांनी 167 अर्ज दाखल केले. 86-नांदेड उत्तरमध्ये 53 इच्छ...
error: Content is protected !!