Homeनांदेड9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात...

9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल -NNL

नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 6 दिवसात 515 इच्छुकांचे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत.

नऊ विधानसभा क्षेत्रापैकी
किनवटमध्ये आज 10 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 31 इच्छुकांनी 45 अर्ज दाखल केले. 84-हदगावमध्ये 33 इच्छुकांनी आज 48 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 66 इच्छुकांनी 88 अर्ज दाखल केले. 85-भोकरमध्ये 76 इच्छुकांनी आज 93 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 144 इच्छुकांनी 167 अर्ज दाखल केले. 86-नांदेड उत्तरमध्ये 53 इच्छुकांनी आज 65 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 81 इच्छुकांनी 97 अर्ज दाखल केले.

87-नांदेड दक्षिणमध्ये 38 इच्छुकांनी आज 50 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 56 इच्छुकांनी 73 अर्ज दाखल केले. 88-लोहामध्ये 19 इच्छुकांनी आज 31 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 54 अर्ज दाखल केले. 89-नायगावमध्ये 18 इच्छुकांनी आज 27 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 48 अर्ज दाखल केले.

90-देगलूरमध्ये 28 इच्छुकांनी आज 39 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 43 इच्छुकांनी 60 अर्ज दाखल केले. तर 91-मुखेडमध्ये 13 इच्छुकांनी आज 19 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 24 इच्छुकांनी 35 अर्ज दाखल केले.नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभेसाठी एकूण 288 इच्छुकांनी आज 388 अर्ज दाखल केले तर आतापर्यंत एकूण 515 इच्छुकांनी 667 अर्ज दाखल केले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments