Homeनांदेडassembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी...

assembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध – NNL

नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतर लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी तूर्तास 39 तर जिल्ह्यातील 9 विधानसभेसाठी 460 उमेदवार वैध ठरले आहेत. अंतिम फेरीतील उमेदवारांची आकडेवारी येत्या 4 नोव्हेंबरला ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील 83-किनवट मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांपैकी आज 29 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 84-हदगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 66 उमेदवारांपैकी आज 63 अर्ज वैध ठरले तर 3 अर्ज अवैध ठरले. 85-भोकर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 144 उमेदवारांपैकी आज 140 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 86-नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 81 उमेदवारांपैकी आज 73 अर्ज वैध ठरले तर 8 अर्ज अवैध ठरले.

87-नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 56 उमेदवारांपैकी आज 52 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 88-लोहा मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 33 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 89-नायगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 26 अर्ज वैध ठरले तर 9 अर्ज अवैध ठरले. 90-देगलूर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 43 उमेदवारांपैकी आज 27 अर्ज वैध ठरले तर 16 अर्ज अवैध ठरले. तर 91-मुखेड मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 24 उमेदवारांपैकी आज 17 अर्ज वैध ठरले तर 7 अर्ज अवैध ठरले आहेत.

असा आहे निवडणुकीचा पुढील कार्यक्रम :
नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख  : 4 नोव्हेंबर
मतदान तारीख.                              :  20 नोव्हेंबर
मतमोजणी तारीख.                         : 23 नोव्हेंबर 2024.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments