HomeनांदेडEco-friendly seedballs : चोरंबा नां येथील विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक सीडबॉल

Eco-friendly seedballs : चोरंबा नां येथील विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक सीडबॉल

हदगाव| दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत असल्याने वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग कमी पर्जन्यमान इत्यादी संभाव्य धोके टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन (Students from Choramba made eco-friendly seedballs) करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे.

चला ऑक्सिजन पेरूया भविष्यात दिसणारा धोका टाळण्यासाठी वृक्षतोड थांबवणे व नवीन वृक्षारोपण करुन संवर्धन करणे आवश्यक आहे. हीच बाब नवीन पिढीत रुजविण्यासाठी शाळा स्तरावरच विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे संस्कार दिले जात आहेत. या शाळेतील पदोन्नत मुख्याध्यापक बालाजी पेंटेवार, पदवीधर शिक्षक डि के पिन्नलवार, ज्योती धुतमल, तसलीम शेख, बाबासाहेब सोनाळे, रविंद्र गंदेवार, मंगल व्यव्हारे, सुचिता कांबळे या शिक्षकांनी मुलांना सोबत असा संदेश देत या वर्षापासून चोरंबा नां येथील चिमुकले विद्यार्थी सीडबॉल तयार करून वृक्षसंवर्धनाचे उल्लेखनीय कार्य करत आहेत.

हदगाव तालक्यातील शंभर घरांचे छोटे गाव असून या ठिकाणी नियमित विविध उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषदेची प्रा. शा. चोरंबा नां येथे या वर्षांपासून सीडबॉल निर्मिती व रोपणाचा उपक्रम राबविला जात आहे. शाळेच्या वतीने सीताफळ रामफळ, जांभूळ, लिंब, चिकू अशा अनेक फळझाडांच्या बिया जमा करण्यात आल्या होत्या. काळी माती शेणखताचे एकत्रित मिश्रण करून त्यात बिया टाकून त्याचे सीडबॉल (मातीचे गोळे) करून वाळवले व पावसाळ्याच्या सुरुवातीला सीडबॉल उजाड माळरानावर रुजविण्यासाठी याचा वापर करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments