Eco-friendly seedballs : चोरंबा नां येथील विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक सीडबॉल
हदगाव| दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत असल्याने वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग कमी पर्जन्यमान इत्यादी संभाव्य धोके टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन (Students from Choramba made eco-friendly seedballs) करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
चला ऑक्सिजन पेरूया भविष्यात दिसणारा धोका टाळण्यासाठी वृक्षतोड थांबवणे व नवीन वृक्षारोपण करुन संवर्धन करणे आवश्यक आहे. हीच बाब नवीन पिढीत रुजविण्यासाठी शाळा स्तरावरच विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे संस्कार दिले जात आहेत. या शाळेतील पदोन्नत मुख्याध्यापक बालाजी पेंटेवार, पदवीधर शिक्षक डि के पिन्नलवार, ज्योती धुतमल, तसलीम शेख, बाबासाहेब सोनाळे, रविंद्र गंदेवार, मंगल व्यव्हारे, सुचिता कांबळे या शिक्षकांनी मुलांना सोबत असा संदेश देत या वर्षापासून चोरंबा नां येथील चिमुकले विद्यार्थी सीडबॉल त...
