हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील नगरपंचायत समोर गेल्या चार दिवसापासून सिटु व लोक विकास संघर्ष समितीच्या वतिने शहरातील नागरिकांच्या प्रलंबीत मागण्या व दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरीत अंमलबजावनी करण्यासाठी दि.२३ जानेवारी २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन (Fourth day of indefinite strike) सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला व पुरुष नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.

शहरात मागील ७० वर्षा पासून अनेक नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्या नावावर घर करावे, नमुना नं. ४३ (अ) मालकी हक्क प्रमाण पत्र देण्यात यावे. तसेच घरकुल बांधण्यासाठी ५ लाख रूपयाची प्रत्येकी तरतूद करावी, नगर पंचायत हिमायतनगर येथील कंत्राटी सफाई कामगार यांचे हजेरी पुस्तक तयार करून बँकेतून पगार देण्यात यावी, त्यांच्या खात्यावर पी. एफ भरणे व आठवड्यातून एक सुट्टी देण्यात यावी. याबाबत मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी लेखी पत्र दिले असून, त्याची त्वरित आमलबजावनी करावी. सफाई (कंत्राटी) कामगाराचे थकित वेतन फरकासह देणे व किमान वेतन कायद्याची अंमलबजावनी करावी.
