हिमायतनगर। हादगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार तथा आगामी निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांनी हिमायतनगर शहरात बुधवारी भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हादगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार सुभाष वानखेडे यांनी बुधवारी हिमायतनगर शहरात भेट दिली. येथील महात्मा फुले सभागृहात त्यांनी कट्टर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीती बाबत चर्चा केली.
तसेच शहरातील बाजार लाईनमध्ये फिरुन नागरिक व व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुभाष वानखेडे यांच्या आगमनाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जुन्या फळीतील शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाले असून, विधानसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.