लोहा| राजकारणात नाते दुय्यम होते आणि कोण पुढे ही स्पर्धा पुढे येते.अनेक वर्षांच्या संबंधाना तडा जातो.भाऊ भाऊ, बहीण भाऊ, चुलता- पुतण्या , बाप -लेक, अशी नाते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी राहतात. राजकारण म्हणून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.व दुरावा मात्र नात्याचा होतो.लोहा कंधार तालुक्यातील दोन मोठ्या कुटुंबात “गृहकलह”चर्चेत आहेत. भाऊ विरुद्ध बहीण-भाऊजी” अशी लढत होण्याची शक्यता असतानाच भाई धोंडगे याच्या पश्चचात त्याच्या कुटुंबातील “भाऊ”वाद चव्हाट्यावर आला आहे .सख्ख्या भावाने पाठ फिरविली पण भाई धोंडगे याना आयुष्यभर साथ देणारे त्याचे सहकारी भाई गुरुनाथराव कुरुडे हे प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या सहकार्याच्या पश्चत आधार”काठी”बनून.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
एक काळ राज्याच्या राजकारणात भाई केशवराव धोंडगे या नावाचा दबदबा होता. लोहा विधानसभा निवडणुक १९५२नंतर पहिल्यांदा चा शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे याच्या पश्चात होत आहे.त्यांनी १४ विधानसभा निवडणुका पहिल्या .१९५७ ते १९९९असा दहा सलग निवडणुका त्यांनी लढविल्या राजकीय विरोधात त्यांनी दंड थोपटले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
चांद्या पासून बाद्या पर्यंत
या मतदार संघात चिखलीकर -धोंडगे कुटुंब निवडणूक रिंगणात उतरले आहे.पण या दोन्ही कुटुंबातील “वाद ” स्वतंत्र पातळीवर समोर आला आहे. माजी खासदार प्रतापराव पाटील यांच्या विरोधात त्यांनी पाच वर्षापूर्वी आपल्या दाजीला म्हणजे सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना निवडणून आणले. राजकिय वारसदार प्रवीण पाटील यांच्या आमदारकी”चा बळी दिला. पण या चार वर्षात दाजी व बहीण आशाताई शिंदे यांनी प्रतापरावांच्या विरोधात काम केले.विधानसभा निवडणुकीत भावाला विरोध आ शिंदे यांना सशक्तीची सेवानिवृत्त देत बहिणीने उमेदवारी दाखल केली. “भाऊ विरुद्ध बहीण” या लढतीत आता धोंडगेद्वयी बंधूंचा विरोधाची भर पडली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
भाई केशवराव धोंडगे यांचे मागील पाऊणे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. पश्चात त्याचे थोरले चिरंजीव ऍड मुक्तेश्वर धोंडगे, व धाकटे चिरंजीव प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांच्यात घरगुती “वाद” टोकाला गेला.दोन्ही भावात “संस्थात्मक”पातळीवर समेट झाला(?)पण “गोडवा ” वाढला नाही.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)
प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांनी उमेदवार दाखल केली.विधानसभा निवडणूकीवर “डोळा”ठेवून दोन वर्षा पासून तयारी करत आहेत. सोमवार(२८ ऑक्टोबर) रोजी त्यांनी उमेदवारी दाखल केली.त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबातील सदस्य व भाई धोंडगे याचे तहयात सहकारी राहिलेले माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे हे उपस्थित होते. थोरले भाऊ ऍड मुक्तेश्वर धोंडगे हे शिउबाठा उमेदवाराचा फॉर्म भरायला आवर्जून हजर होते.
भावाच्या उमेदवारीला “मोठ्या”भावाची अनुउपस्थित चर्चेला आणि “भावा विरुद्ध बहीण “या लढतीशी याची तुलना झाली .भाई केशवराव धोंडगे यांच्या पश्चात त्याच्या ” चिरंजीवातील “बेबनाव या निमित्ताने उजागर झाला.भावा भावात कितीही दुरावा अबोला असू देत ते तुटत नाही त्यामुळे दिवाळीत ” या दोन्ही भावात “भाऊबीजेला “गोडवा होईल अशी चर्चा सुरू आहे.