Loha Asembly election : सख्ख्या भावाची पाठ ; पण भाई धोंडगेचे सहकारी भाई कुरुडेंची प्रा पुरुषोत्तम याना साथ -NNL
लोहा| राजकारणात नाते दुय्यम होते आणि कोण पुढे ही स्पर्धा पुढे येते.अनेक वर्षांच्या संबंधाना तडा जातो.भाऊ भाऊ, बहीण भाऊ, चुलता- पुतण्या , बाप -लेक, अशी नाते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी राहतात. राजकारण म्हणून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.व दुरावा मात्र नात्याचा होतो.लोहा कंधार तालुक्यातील दोन मोठ्या कुटुंबात "गृहकलह"चर्चेत आहेत. भाऊ विरुद्ध बहीण-भाऊजी" अशी लढत होण्याची शक्यता असतानाच भाई धोंडगे याच्या पश्चचात त्याच्या कुटुंबातील "भाऊ"वाद चव्हाट्यावर आला आहे .सख्ख्या भावाने पाठ फिरविली पण भाई धोंडगे याना आयुष्यभर साथ देणारे त्याचे सहकारी भाई गुरुनाथराव कुरुडे हे प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या सहकार्याच्या पश्चत आधार"काठी"बनून.
एक काळ राज्याच्या राजकारणात भाई केशवराव धोंडगे या नावाचा दबदबा होता. लोहा विधानसभा निवडणुक १९५२...
