लोहा| यंदाची दिवाळी तशी “राजकीय “. निवडणूकीचा काळ त्यातच लोहा कंधार मतदार संघात काँग्रेस च्या “सुतळी बॉम्ब”फुसका ठरला. निवडणूक आली की मुलाखती घेतात अन प्रचार दुसऱ्या पक्षाचा करतात.गेल्या चाळीस वर्षा पासून “,शिवसेनेचा “धनुष्य ” उचलणाऱ्याना गतकाळीं आठवणीच्या “टिकल्या”वाजविण्याची वेळ यंदा आली.”मोदीं है तो मुमकीन”म्हणत पाच वर्षे जिल्ह्यात ‘कमळ” फुलविणारे “अजित “रॉकेट घेऊन आखाड्यात रंग “भरत आहेत.यंदाच्या दिवाळीत अनेक जण “भावीआमदार”या नावाचे ,उटणे लावून सज्ज झालेत. तशी दिवाळी “सुगी”होईल अशी “आशा”बाळगत मतदार संघात लोक “वाट पाहत आहेत.
निवडणूक घेऊन यंदाची दिवाळी आली . चाळीस वर्षा पासून शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे “शिव धनुष्य “घेऊन लोहा कंधार तालुक्यात पर्यायाने जिल्हयात गावोगावी पोहचविणारे लोहेकरांचा राजकीय बॉम्ब अजून पेटलाच नाही. पक्षात एक-“नाथ ” सुरसुरी वाजत आहे. काँग्रेसवाल्यानी कड घेतली आहे “लक्ष्मी” तोटा कधी लावायचा ..कुठ कुठ लावायचा याच सगळं गणित काँग्रेसकडे असल्याचे दिसते बाचोटी मध्ये पुन्हा ‘गुलाल ‘उधळायची तयारी होती “एमआरएस ” या नव्या ब्रॅन्डची गावोगावी’नोंदणी’ सुरू करण्याचा विचार झाला पण नंतर “तिसरा ‘ पर्याय समोर आला घडयाळ गेलं आणि “गुलाबी जीप” सुद्धा त्यामुळे येत्या चार दिवसात “डब्बल “बार होणार की आणखी दुसरे काही याकडे मतदार संघाचे लक्ष लागलें आहे.
त्याच्या पारंपरिक विरोधकांनी “घड्याळ” बांधले त्यामुळे बाचोटीकरांचे राजकीय डावपेच, व्युहरचना काय राहील (?) मतदार संघ की राज्यभर स्टार प्रचारक म्हणून जाणार याचे मंथन सुरू दिसते. बीआरएस पक्षाचा ‘लक्ष्मी ‘तोटा ‘फूसकाच निघाला,त्यामुळे यंदा बाचोटीत दिवाळी सोयाबीन, कापसाला” भाव “योग्य मिळत नाही म्हणून दिवाळी साधीच असेल. राज्यातील महायुती मध्ये विशेषतः भाजपा विषयी जनसामान्यांत रोष आहे. तो ‘तिखटपणा’ बदलत्या वातावरणात अधिकचा आला. लोकसभेत ना “प्रताप” घडला नाही “अशोक “.वृक्षांची सावली पडली . सत्ताधाऱ्याच्या विरोधात ‘उलटे वारे वाहताहेत ते ‘ ‘वारे मतलबी ‘झाले त्याचा फटका बसला त्यामुळे लोहा कंधार सत्ताधारी महायुतीने आदलाबदल झाली.
iचंदनज्योत (प्रताप ज्योत) या मतदार संघात पेटविण्याची तयारी सुरू आहे .”सहा बार “फटका उडविण्यात येणार आहे. अचूक वेळ साधत चिखलीत यंदाची दिवाळी खुशी- खुशी “अशी राहणार आहे. बाजूच्या हळदा गावात दिवाळीच्या आधीच दररोजच फटाक्यांचा ” तडतड” आवाज येत होता. मविआ चा “ऍटम बॉम्ब “आम्हीच उडवू असे जाहीरपणे सांगणाऱ्या हळदेकरांचा”फुसका’बार निघाला. पण मोठा आवाज”लक्ष्मी”बॉम्ब ची बँग ससोबतच असते त्यामुळे “पुन्हा “आवाज करू अशी “आशा”याना वाटते. पण फराळात मीठ जास्तीचे पडले आणि “साहेबांच्या “माघारी मुळे यंदाची दिवाळी ” कभी खुशी -,कभी गम”अशीच राहणार आहे विश्वनाथ संकुलात यंदा दिवाळी जोरात आहे शिवाजी नगर व वसंत नगर एकाच पक्षात आले.
आणि कल्याणराव खुश झाले त्याचे फटाके जोरात उडतील तर माणिकराव मुकदम यांची दिवाळी नेहमीप्रमाणेच असेल पानभोसी मध्ये यंदाची दिवाळी पूर्वी सारखीच असेल नेत्यांनी पक्ष सोडला अन मोठे भोसीकर यांचे महत्व वाढले ” ‘हातात’ हात’ घेऊनि– हृदयास-हृदय जोडुनी’ चा प्रयोग केला जात आहे. संजय भोसीकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर गोड ‘फराळ’ ‘चकल्या’ अन सोबत राजकीय ‘फटाके’ उडविण्याची तयारी केली आहे. बहादरपूर येथे क्रांतिभवन मध्ये दिवाळी चे “फुलबाजे ” वेगळेच उडताहेत.. अशोक ‘रॉकेट’साथीला येईल असे एकेकाळी वाटायचे पण घराच्याची नाही साथ -कशी पेटेल विजयाची “वात”म्हणत “साप गोळी”लावली जात आहे येथे दिवाळीच्या फटाक्याच आवाज “डब्बल येणार आहे.
सध्या मतदारसंघात रोजच सोशल मीडियातून ‘सुरसुऱ्या’ उडविल्या जात आहेत. परंतु या टिकल्याचा ‘आवाज व ‘ फटाके आणखी वीस दिवस चालतील. राजकीय, चर्चेच्या तर्कवित्तर्कात ‘खमंग खमंग’ चकल्या अन तोंडी गोड बुंदी लाडू खात भाष्य वर्तविले जात आहे. त्यातच यंदा जरांगे पाटील याचा फटका मोठा तर ओबीसीं चे रॅकेट काही जण उडवू पाहत आहेत. चंद्रसेन पाटील याच्याकडे ओबीसी चाभुईनळा, शिवा नरंगले कडे लख्ख “प्रकाश”,प्रा धोंडे कडे वेगवेगळ्या बाराच तोटे आहेत संजय पाटील कऱ्हाळे याच्या फटाक्यांची वात ओलसर झाली. तर बाळासाहेब कऱ्हाळे याच फटका कधी वाजेल याचा थांगपत्ता नाही शरद पवार याच्याकडील फटक्याला वाती वेगवेगळ्या त्यामुळे त्या जेथे जातील तसाच वाजतात काही फटाके “शिवाजीनगर “लेबलचे सुद्धा आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘तोटे’ असतानाही ‘भुईनळा’ ‘ कुठे ‘सुरसुरऱ्या’ काही ठिकाणी ‘तुडतुड्या ‘लावून आनंद घेतला जात आहे.टिकल्या तर रोजच उडवित आहेत. प्रताप ‘रॉकेट’ मुळे “यंदाच्या “दिवाळी बहिणीने “”खास “विरोधी” उटणे तयार केले आहे .