लोहा| जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लोहा येथे गेल्या आठ वर्षां पासून पत्रकार हरिहर धुतमल ,काशिनाथ शिरसिकर व मित्रपरिवार ना नफा तत्वावर ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी निरपेक्ष भावनेने अभ्यासिका चालवतात.दिवाळी निमित्ताने ग्रंथ पूजा करण्यात आली.
विद्युत पुरवठा खंडित झाल्या नंतर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहून लोह्यातील प्रसिद्ध व्यापारी दशरथ सावकार सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, गंगाधर सावकार सूर्यवंशी यांनी इव्हेंटर भेट दिले. जिज्ञासा अभयसिका निरपेक्ष भावनेने गेल्या आठ वर्षा पडून हरिहर धुतमल, काशिनाथ शिरसिकर, पांडुरंग भातलवंडे, प्रकाश जिरेवार, कै. प्रशांत मोटरवार या मित्रपरिवारानी एकत्रित येऊन सुरू केली. आठ वर्षात अभ्यासिकेत अभ्यास करून ६५ विद्यार्थी शासकीय नौकरीला लागले आहेत. डीवायएसपी, डॉक्टर, प्राध्यापक, पोलीस, एसआरपी, सीआरपीएफ, मिलिटरी, शिक्षक असा वेगवेगळ्या विभागात विद्यार्थी रुजू झाले आहेत.
लोह्यातील माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, दशरथ सावकार सूर्यवंशी, रामराम सूर्यवंशी, गंगाधर सावकार, माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी हे परिवार सामाजिक दायित्व जोपासत असते.जिज्ञासा अभ्यासिकेत लाईट गेल्या नंतर विद्यार्थ्यांना त्रास होतो .खेड्यापाड्यातील हे विद्यार्थी अभ्यास करून आपले भवितव्य घडवीत आहेत. हरिहर धुतमल व मित्रपरिवार यानी सुरू केलेला उपक्रम शैक्षणिक दृष्टया उपयुक्त आहे विद्युत पुरवठा खंडितझाल्या नंतर गैरसोय होऊ नये म्हणून माजी उपनगराध्यक्ष रामराम सूर्यवंशी व कुटुंबाने अभ्यासिकेला इव्हेंटर भेट दिले.
दिवाळी निमित्त त्याच्याहस्ते तसेच माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, हरिभाऊ चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथ पूजा करण्यात आली. अभ्यासिकेच्या वतीने रामराव सूर्यवंशी याच्या सत्कार करण्यात आला.संचालक प्रवीण धुतमल, बालाजी ढवळे, व्यवस्थापक बालाजी धनसडे, ओम पुरी,तनय धुतमल यासह विद्यार्थी उपस्थित होते हरिभाऊ चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले संचालन व आभार हरिहर धुतमल यांनी केले. माजी नगरसेविकाकमलबाई धुतमल, सौ शिल्पा हरिहर धुतमल , सौ सुषमा सुनील धुतमल, कु सेजल धुतमल, कु सृष्टी धुतमल उपस्थित होते.