Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Mahendra Gaikwad : पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात महेंद्र गायकवाड यांचा विशेष सन्मान -NNL

Mahendra Gaikwad : पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात महेंद्र गायकवाड यांचा विशेष सन्मान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला मिमांसा फाउंडेशन, दै. समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता पुरस्कार -2025 सोहळ्याचे आयोजन नांदेड विश्रामगृहातील सभागृहात करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त देणात येणाऱ्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात विधानपरिषदेचे शिवसेना गटनेते आ. हेमंत पाटील, खा. रविंद्र चव्हाण, नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव बोंढारकर,हदगावचे आ. बाबुराव कोहळीकर, हिंदुस्थान टाईम्स मुंबईचे पत्रकार सुरेंद्र गांगण,मॅक्स महाराष्ट्र मुबंईचे पत्रकार मनोज भोयर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, आयोजक रुपेश पाडमुख, सखाराम कुलकर्णी यांच्याहस्ते शहरी व ग्रामीण...
Keshav mekale ; यात्रा महोत्सवात शालेय लेझीम स्पर्धा घेणे कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले -NNL

Keshav mekale ; यात्रा महोत्सवात शालेय लेझीम स्पर्धा घेणे कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर। तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव मंदिर यात्रा महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन लेझीम स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या यात्रा कमिटीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे उदगार लेझीम स्पर्धेचे उद्घाटक श्री.केशव मेकाले यांनी केले. पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव मंदिराची यात्रा अनेक वर्षापासून सुरू असुन नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता पार्श्वनाथ महादेव मंदिराच्या अभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात असुन यात्रेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. महाप्रसादासह लेझीम स्पर्धा, संगीत भजनाचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शालेय लेझीम स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती हिमायतनगरचे गट शिक्षणाधिकारी ...
Of Grain Collected ; एक मूठ धान्य संकलनातून अभिनव मदत; वृद्धाश्रम करीता ८ क्विंटल धान्य गोळा -NNL

Of Grain Collected ; एक मूठ धान्य संकलनातून अभिनव मदत; वृद्धाश्रम करीता ८ क्विंटल धान्य गोळा -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूरच्या जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे व शीतल भवरे यांच्या संकल्पनेतून एक मूठ धान्य संकलनातून विद्यार्थ्यांनी अभिनव अशी मदत उभारली आहे.  विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य देत जवळपास ८ क्विंटलचा धान्यसाठा वृद्धाश्रम करीता मदतीसाठी उभारला. शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे तालुका भरात कौतुक होत आहे. नवीन वर्षाचे औचित्य साधून शहरातल्या जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य संकलन हा उपक्रम राबवून अनाथ निराधार वृद्धाना मदत करण्याचा संकल्प केला. २ जानेवारी ते ४ जानेवारी पर्यंत ही मोहीम राबविण्यात आली यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी व पालकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. गहू, ज्वारी, तांदूळ, तुर दाळ, चना दाळ याप्रमाणे शाळेतील यल.के.जी ते बारावी च्या विद्यार्थीनी एकत्रित अंदाजे ...
Celebrating Journalist’s Day : जि.प.प्रा.शाळा इस्लापूर व शालेय समितीच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

Celebrating Journalist’s Day : जि.प.प्रा.शाळा इस्लापूर व शालेय समितीच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| इस्लापूर येथील नविन जि.प.प्रा.शाळा सावरकर नगर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड व उपस्थित पत्रकार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांचे शालेय समितीच्या वतीने नोटबुक व पेन देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकार परमेश्वर पेशवे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले व पत्रकार दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक इर्शाद पांडे यांनी केले. यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड,परमेश्वर पेशवे,गौतम कांबळे, प्रमोद जाधव,रावसाहेब कदम, इमरान घोडके, विशाल भालेराव, तसेच शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व पा...
University students performed in a play : विद्यापीठातील विद्यार्थी रंगले नाट्यवाचनात ; ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचा आनंददायी वाचन सोहळा -NNL

University students performed in a play : विद्यापीठातील विद्यार्थी रंगले नाट्यवाचनात ; ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचा आनंददायी वाचन सोहळा -NNL

करियर, नांदेड
 नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत नुकतेच नाट्यसंहिता व ललित साहित्याचे अभिवाचन या वाचन सोहळ्याचे आयोजन केले होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी होते. तर डॉ. नीना गोगटे, डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर व प्रा. राहुल गायकवाड यांची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभागाच्या विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमात कृष्ण चंदर लिखीत व भारत सासणे अनुवादीत ‘उघडा, दरवाजे उघडा’ या मुळ उर्दु नाटकाच्या संहितेचे वाचन केले. यावेळी वाचणारे विद्यार्थी व ऐकणारे रसिक दोघेही नाट्यवाचनात रंगून गेले होते. नाटकातील मिश्कील प्रसंगाच्या वाचनादरम्यान विद्यार्थी व...
Awarded to journalist Prashant Gawle : पत्रकार प्रशांत गवळे यांना पुरस्काराने सन्मानित -NNL

Awarded to journalist Prashant Gawle : पत्रकार प्रशांत गवळे यांना पुरस्काराने सन्मानित -NNL

नांदेड, करियर
नांदेड| मीमांसा फाऊंडेशन, दै. समीक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा अत्यंत महत्वाचा असलेला वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरातीचा आधारस्तंभ हा पुरस्कार दै. लोकपत्रचे उपसंपादक प्रशांत गवळे यांना मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून देण्यात आला. नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह दि. 5 जानेवारी रोजी दर्पण दिनाच्या पुर्वसंध्येला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. हा पुरस्कार दै. लोकपत्रचे उपसंपादक प्रशांत गवळे विधान परिषदेचे सभागृहनेते तथा आमदार हेमंत पाटील, खा. प्रा. रविंद्र चव्हाण, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर, आ. बाबुराव पाटील कोहळीकर, हिंदुस्थान टाईमचे सुरेंद्र गंगण, मॅक्स महाराष्ट्राचे मनोज भोयर, नांदेड जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, दै. समीक्षाचे संपादक तथा आयोजक रूपेश पाडमुख यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्...
Suresh Ambatwar ; डॉ. शंकरराव चव्हाण नवीन नांदेड पत्रकारिता पुरस्काराने सुरेश आंबटवार सन्मानित – NNL

Suresh Ambatwar ; डॉ. शंकरराव चव्हाण नवीन नांदेड पत्रकारिता पुरस्काराने सुरेश आंबटवार सन्मानित – NNL

नांदेड, करियर
नांदेड l पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने नवीन नांदेड भागातील पत्रकार बांधवांना देण्यात येणारा, डॉ. शंकरराव चव्हाण नवीन नांदेड पत्रकारीता पुरस्कार उपसंपादक सुरेश आंबटवार यांना, खा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून, मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने, दरवर्षी नवीन नांदेड भागातील एका पत्रकार बांधवांस डॉ. शंकरराव चव्हाण नवीन नांदेड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. गतवर्षी पत्रकार दिंगाबर शिंदे यांना सन्मानित करण्यात आले होते. तर यंदा दै. लोकपत्रचे उपसंपादक सुरेश आंबटवार यांना, खा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संयोजक, मराठी अपडेटचे संपादक तथा काँग्रेस जिल्हाप्रवक्ते बापूसाहेब पाटील, काँग्रेस कार्याध्यक्ष महेश देशमुख, पत्रकार दिंगाबर शिंदे, शेख कलीम आदीजन उप...
Chief Minister’s Employment Generation Programme : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत विशेष मोहिमेंतर्गत 6 ते 20 जानेवारी कालावधीत गतीमानता पंधरवड्याचे आयोजन -NNL

Chief Minister’s Employment Generation Programme : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत विशेष मोहिमेंतर्गत 6 ते 20 जानेवारी कालावधीत गतीमानता पंधरवड्याचे आयोजन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| सुशिक्षित बेराजगार युवक व युवती यांनी आपला स्वत:चा उद्योग/व्यवसाय स्थापन करावा, या उद्देशाने राज्य शासन पुरस्कृत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही शासनाची महत्वाकांक्षी योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते. योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हयात मोठया प्रमाणावर उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून 6 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतीमानता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयातील इच्छुक व होतकरु युवक/युवती यांनी तसेच बेरोजगार युवक व युवती यांनी नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे वा व्यवसायवाढ करावयाची आहे अशा इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच...
Savitribai Fule ; सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले –  मुख्याध्यापक दत्ता गादेकर -NNL

Savitribai Fule ; सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – मुख्याध्यापक दत्ता गादेकर -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर। अठराव्या शतकात चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून समाज सुधारणेच्या कार्यामध्ये महत्त्वाची क्रांती करणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांची जयंती दिवस हा बालिका दिन म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लाट खुर्द तालुका कंधार येथे थाटात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्ता गाडेकर हे होते ., तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अनिता दिगंबर इंगोले ( माजी उपसरपंच लाट खुर्द) व शिक्षक वृंद यांच्यासह शाळेतील विद्यार्थिनींनी माता सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा परिधान करून उपस्थित होत्या .यावेळी विशेष आकर्षक ठरले. सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील जवळपास चाळीसच्या आसपास विद्यार्थिनींनी उत्कृष्...
Educational trip to Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत शैक्षणिक सहल; जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला शाळांचा प्रतिसाद -NNL

Educational trip to Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत शैक्षणिक सहल; जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला शाळांचा प्रतिसाद -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगावची यात्रा एक सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र आहे. या यात्रेला चारशे वर्षाची परंपरा आहे. शालेय विद्यार्थ्यांना यात्रेची ऐतिहासिक परंपरा यात्रा पाहता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शालेय विद्यार्थ्यांची सहल काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या. शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनात कंधार, भोकर, नांदेड, लोहा आणि इतर तालुक्यातील शाळेंनी सहलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी येथील धार्मिक तीर्थ, मंदिर व परिसर पर्यटनाचे सांस्कृतिक केंद्र आहेत. घोडे, अश्व, कृषी व पशुप्रदर्शनी व येथील बाजार तसेच बाल गोपाळांसाठी आलेल्या आकाश पाळणा, विविध खेळाची साधनाचा त्यासाठी आस्वाद घेतला. शासनाच्या वतीने जिल्हा परिषद या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांच्...
error: Content is protected !!