लोहा। स्पर्धा परीक्षेत नियमित अभ्यास केला पाहिजे जाहिरात आले की अभ्यास केला तर आपला रिझर्ट येईलच याची शक्यता कमी असते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्य असले पाहिजे अपयशाने खचून जाऊ नये नियमित अभ्यास करावा असे ऑनलाइन मार्गदर्शन झुम।द्वारे विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे यांनी केले.
लोहा शहरातील जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रात ऑनलाइन झुम द्वारे विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना संचालक हरिहर धुतमल पत्रकार गोविंद कदम बेनाळकर , इमाम लदाफ, बालाजी ढवळे यांची उपस्थिती होती महेंद्र यांनी अतिशय कष्टाने शिक्षण घेतले .तलाठी नौकरी सोडून दिली व स्पर्धा परिक्षा अभ्यास सुरूच ठेवला त्याच्या पत्नी किरण यांची गंभीर साथ मिळाली .आई कमलबाई वडील लक्ष्मणराव याचे प्रेरणा मिळाली.
ऑनलाईन मार्गदर्शन करताना विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे यांनी विद्यार्थी हा नेहमी सजग राहिले पाहिजे. सातत्य असले पाहिजे खूप अभ्यास करावा आणि यश मिळवावे कोणते पुस्तके वाचावीत असे मार्गदर्शन केले प्रस्तावित हरिहर धुतमल यांनी तर आभार रत्नाकर महाबळे यांनी केले.