नांदेड l नांदेड येथे नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत डॉ. प्रफुल्ल जटाळे आणि डॉ. सुनील देशमुख यांनी जबरदस्त कामगिरी करताना पदकांची लूट केली.
डॉ. सुनील देशमुख यांनी जलतरणात २ सुवर्ण, ३ रौप्य व सायकलिंगमध्ये एक अशा पाच पदकांची कमाई केली. तसेच डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी सायकलिंगमध्ये ५० कि. मी. रेसमध्ये आणि मॅरेथॉनमध्ये अशा एकूण दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. तसेच जलतरणात एक रौप्य व एक कांस्य पदक पटकावले. या दोघांना अभय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राज्य क्रीडा स्पर्धेत पदकांची लूट केल्याबद्दल जटाळे व देशमुख यांचा मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मडलेचा, सुंदरबाबू सोरोसिया, रुस्तुम तुपे, ट्रायथलॉनचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अभय देशमुख यांच्या उपस्थितीत मनपाच्या स्विमिंग पूल येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
नांदेड येथे झालेल्या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पदकांची लूट करणाऱ्या डॉ. प्रफुल्ल जटाळे आणि डॉ. सुनील देशमुख यांचा सत्कार करताना मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, रुस्तुम तुपे व अभय देशमुख आदी