Friday, May 15

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य नोंदणी सुरुवात -NNL

Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य नोंदणी सुरुवात -NNL

नांदेड, करियर
नांदेड। मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सन 2025-2026 या कालावधीतील सदस्य नोंदणी उद्या दि.13 जानेवारी रोजी पासून सुरुवात होणार आहे. संबंधितांनी सदस्य नोंदणीचा अर्ज भरून त्यावर रंगीत आकाराचा पासपोर्ट फोटो लावावा. सोबत ज्या माध्यम समूहाचे काम करत असल्यास त्यांचे चालू वर्षाच्या ओळखपत्राची झेरॉक्स सोबत जोडावी. तसेच नविन सभासदांना 350 रुपये तर जुन्या सभासदांना 300 रुपये सदस्य नोंदणी शुल्क आकारली जाणार आहे. इतर संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांना सदस्य करून घेतल्या जाणार नाही.तसेच सदस्य नोंदणीचा अर्ज शुल्क भरून दिल्यानंतर सदस्यत्व बहाल करण्यासंदर्भातला निर्णय मराठी पत्रकार परिषद व जिल्हा संघाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. सदरील नोंदणी दि.31 जानेवारी 2025 पर्यंत करावयाची आहे.त्यानंतर नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्या जाणार नाही. सदस्य नोंदणीचे अर्ज दैनिक सत्यप्...
Western Regional Youth Festival : ‘स्वारातीम’ विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पाच पारितोषिके -NNL

Western Regional Youth Festival : ‘स्वारातीम’ विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पाच पारितोषिके -NNL

करियर, नांदेड
नांदेड| अखिल भारतीय विद्यापीठ संघ आणि मेहसाणा (गुजरात) येथील गणपत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सतरंग’ हा आंतर राज्यस्तरीय पश्चिम विभागीय युवा महोत्सव दि. ०४ ते ०८ जानेवारी या कालावधीत नुकताच संपन्न झाला. या महोत्सवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ४० विद्यार्थी कलावंतांनी एकूण २१ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. नृत्य, नाट्य, संगीत व ललित कला या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला आदिवासी नृत्य, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, मेहंदी व मिमिक्री या कला प्रकारात नैपुण्य मिळवत विद्यापीठाला पाच पारितोषिके मिळवून दिली आहेत. शिवराज मुधोळ (मेहंदी) द्वितीय, अर्जुन पवार ...
Jijau Jayanti : लोहयात जिजाऊ जयंती निमित्ताने उत्साहात भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न -NNL

Jijau Jayanti : लोहयात जिजाऊ जयंती निमित्ताने उत्साहात भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न -NNL

नांदेड, करियर
लोहा| राष्ट्रमाता जिजाऊ जयंती त्यानिमिताने लोह्यात मोठ्या उत्साहात शहराच्या मुख्य रस्त्याने वाजत गाजत लेझीमच्या तालावर ..जय जिजाऊ ..जय शिवराय...असा घोषणांचा निनाद करत ..शोभायात्रा मोठ्या आनंदी वातावरणात पार पडली.. दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवारी जिजामाता ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत चालणाऱ्या शाळांच्या वतीने शिवछत्रपती विद्यालयातून शहराच्या मुख्य रस्त्याने शोभा यात्रा निघाली. संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृ भा जाधव , माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, व्ही जी चव्हाण, प्रा डॉ डी एम पवार, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण,सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक बी डी जाधव संस्थेच्या संचालिका वंदनाताई पवार, मारुती पाटील बोरगावकर ,अप्पाराव पवार, ज्ञानोबा पवार, दशरथ पवार, संकल्पक शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्याप...
World Hindi Day ; शिवाजी विद्यालयात जागतिक हिंदी दिन साजरा – NNL

World Hindi Day ; शिवाजी विद्यालयात जागतिक हिंदी दिन साजरा – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेत जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षिका सौ.के. पी.पल्लेवाड,सौ.एस.आर बीरगे, बी.जी.हंबर्डे, ए.के.जांबकर, सौ.व्ही.यु.भाले, एस.ए.कोरडे,ए.डी. मोरे, जी.ए. जाधव, एन.पी.जाधव व डी.जी. पवार उपस्थित होते,यावेळी विद्यार्थ्यांनी विवीध हिंदी गीत सादर केले. त्यानंतर सहशिक्षक बी.जी.हंबर्डे यांनी हिंदी विषयाचे महत्व विशद करतांना सांगीतले की भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. १० जानेवारीला देशभरात हिंदी दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारताशिवाय जगात असे अनेक देश आहेत जिथे हिंदी भाषिक लोक आहेत. हिंदी ही भारतातील एकमेव भाषा आहे जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि ईशान्येपासून गुजरातपर्यंत बोलली जाते. ह...
An internal book exhibition : हु.ज.पा.महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन संपन्न -NNL

An internal book exhibition : हु.ज.पा.महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन संपन्न -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील ग्रंथालय विभाग यांच्या तर्फे दिनांक 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवडा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने आज दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाद्वारे ग्रंथ प्रदर्शन संपन्न. सुरुवातीला महाविद्यालयातील प्राचार्या डॉ .उज्ज्वला सदावर्ते यांच्या हस्ते जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा प्राध्यापक गुंडाळे सर यांनी मांडली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध कादंबरी कथा विविध साहित्य समाज सुधारक यांच्या विषयी ग्रंथ ठेवण...
Employment Motivation Program : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उघोजगता प्रेरणा कार्यक्रम -NNL

Employment Motivation Program : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उघोजगता प्रेरणा कार्यक्रम -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा 'जागतिक युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त माहूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रविवार दि,१२ जानेवारी रोजी दु,१वा. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन व या संस्थेतून यशस्वी उघोजक म्हणून नावारूपास आलेले व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा 'गौरव' तज्ञांचे मार्गदर्शन व विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य फारूखी ऐ,वासे यांनी दिली. १२ जानेवारी या दिवशी 'स्वामी विवेकानंद' यांची जयंती असून, हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून भारतभर साजरा करण्यात येतो, या दिनाचे औचित्य साधत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील युवकांच्या विविध कलागुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी, वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पार...
UGC Announced : यु.जी.सी.ची औपचारिक अधिसूचना जाहीर – डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांची प्रतिक्रिया -NNL

UGC Announced : यु.जी.सी.ची औपचारिक अधिसूचना जाहीर – डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांची प्रतिक्रिया -NNL

करियर, नांदेड
नांदेड| "विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापक निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक अहर्ता, बढती व उच्च शिक्षणातील गुणवत्तेचे निर्वाह साधनाचे मापदंड" त्यात प्रामुख्याने कॅस- गुणवत्ता प्रगती योजने अंतर्गत सर्वोच्च बढती "प्रोफेसर " पदनामसाठी केवळ "पियर रीव्हिव्हड जर्नल" चे मापदंड दिले आहे. त्यामुळे व्यावसायिक कारणासाठी अधिक बळकटी मिळेल यात, स्कोपस किंवा यु. जी. सी लिस्ट जर्नल चा कुठे ही उल्लेख नाही. दुसरी बाब म्हणजे कुलगुरू पदासाठी जर एखादा उमेदवार जर अ. जा/, अ. जन जाती /ओ बी सी /अल्पसंख्यक /महिला प्रवर्गातून असेल तर विहित निवड समितीत सदरील प्रवर्गाचा सदस्य असावा की नाही? या बाबत केंद्र व राज्य शासनाचे जे धोरण असतील ते तपासावे असे सूचित केले परंतु या धोरनाचा उमेदवारांना काहीच फायदा होणार नाही.कुलगुरू पदासाठी आरक्षण धोरणाची तरतुद अंतर्भुत करावी.तरच सामाजिक न्याय मिळेल.. ....डॉ. राजपालसिंह चिख...
Reading Sankalp ; हु .ज.पा.महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन -NNL

Reading Sankalp ; हु .ज.पा.महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन -NNL

नांदेड, करियर
नांदेड। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग आणि ग्रंथालय यांच्यातर्फे दिनांक 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवडा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत . त्यानिमित्ताने आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये या तिन्ही विभागाद्वारे पुस्तक परीक्षण व लेखन स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेमध्ये सुरुवातीला महाविद्यालयातील प्राचार्या डॉ .उज्वला सदावर्ते यांच्या हस्ते जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा ग्रंथपाल बोंबले राजू यांनी सांगितली तसेच अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांनी केले. त्या...
Dr. Pawan Emekar ; डॉ पवन एमेकर यांची सहयोगी प्राध्यापक पदी पदोन्नती – NNL

Dr. Pawan Emekar ; डॉ पवन एमेकर यांची सहयोगी प्राध्यापक पदी पदोन्नती – NNL

नांदेड, करियर
मुक्रमाबाद। कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय हनेगाव येथील हिंदी विषयाचे प्रा. डॉ. पवन नागनाथ एमेकर यांना दिनांक 09/01/2025 रोजी सहा. प्राध्यापक पदावरून सहयोगी प्राध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.रामरावजी राठोड साहेब, डॉ.चरणसिंह राठोड,नांदेड येथील सहसंचालक डॉ किरण बोदांर , विद्यापीठ प्रतिनिधी डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. रावसाहेब जाधव, विषय तज्ञ डॉ. विश्वनाथ भालेराव, डॉ. बालाजी भुरे ,प्राचार्य डॉ. पंचशील एकंबेकर , विभागाध्यक्ष डॉ.उमाकांत बिरादार, या समिती द्वारे पदोन्नती देण्यात आली. या यशासाठी प्रा.स्वरूपजी राठोड, डॉ. मानवते, डॉ.साबणे,डॉ. कळसकर, डॉ. शिंदे, डॉ. हंगरगेकर, सौ.डॉ. कांबळे, सौ.प्रा.कांबळे, डॉ. राठोड, प्रा. बिरादार, प्रा.जाधव, सौ.डॉ.पटेल, श्री.पवार, श्री. झमकाडे, श्री. राठोड, श्री. चव्हाण, श्री.सुरेवाड , श्री मचकुरी, शहाबाज, रोहित आदींनी शुभ...
Journalist Day celebration : नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

Journalist Day celebration : नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

नागपूर, करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| दि.६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघ, महा.राज्यचे राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व मंच्यावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांबेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली. नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघ, महा.राज्यचे राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक मान्यवराचे भाषण झाले. त्यानंतर राष्ट्रीय अध्याक्ष्यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांना मार्गदर्शन करतांना पत्रकारिता ही केवळ स्वताच्या स्वार्तासाठी नसून सर्व पत्रकारांनी समाजातील प्रत्येक घटक...
error: Content is protected !!