नवीन नांदेड l राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र बळीरामपुर येथील जिल्हा परिषद शाळा येथे सरपंच सौ. रेणुका पांचाळ यांचा हस्ते सुरुवात करण्यात आली यावेळी परिसरातील 500 विध्यार्थी यांना वाटप करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा बळीरामपुर उपकेंद्र अंतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्याभवन शाळा, विवेकानंद शाळा, अंगणवाड्या येथील विद्यार्थी व बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या ,येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विवेक पदमणे,आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक मोहम्मद खैसर , शेख जमीला,
सुनिता भद्रे, व केंद्र प्रमुख मठपती, मुख्याध्यापक सुनिता चंदावार , ढवळे, शिंगोटे, हंबर्डे यांच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व आशाताई हजर होते.