नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यी पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढोलताशांच्या गजरात,फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला, महायुतीचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगोबडो घोषणा देण्यात आल्या .
महाराष्ट्र ओ बी सी मोर्चा प्रदेश सचिव संतोष वर्मा यांच्या वतीने 4 डिसेबंर रोजी भाजपा गठबंधन बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर सिडको भाजपा मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतषबाजी ढोलताशांच्या गजरात व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला. प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जनार्दन ठाकुर,माजी नगरसेवक अभिषेक सौदे, जनार्दन गुपीले, डॉ.विधानंद भोंग,विनोद कांचनगिरे, धिरज स्वामी, निखिलेश देशमुख,महेंद्र तरटे, विजया गोडघोसे, सुषमा ठाकूर, सुमन राठोड ,फड ,मोनु जोशी,मयुर वर्मा, शुभम जोशी,संगम कांचनगिरे, संजय बेरूळकर,निरज चव्हाण, रितेश चोदंते, गोविंद कदम,राम बोरले पवार,कल्याण येजगे, नरेंद्र बयास, व्यंकट बोरलेपवार, शिवसेना शिंदे गटाचे सिडको ऊपशहरप्रमुख पप्पू गायकवाड यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.