नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून अनेक अधिकारी नियुक्ती झाली मात्र नागरीकांच्या अडीअडचणी व प्रलबिंत कामांना गती देण्यासाठी, मालमत्ता कर, पाणी पट्टी थकबाकी वसुलीसाठी कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी डॉ. मिर्झा बेग यांची पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश काढले असून करनिरीक्षक सह वसुली लिपीक व्दारे दैनंदिन मालमत्ता, पाणी पट्टी करात वाढ झाली आहे.
नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी आयुक्त म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती अधिकारी यांनी या क्षेत्रीय कार्यालयचे काम पाहिले, 18 ऑक्टोबर रोजी डॉ. मिर्झा बेग यांनी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली,प्रभारी सहाय्यक आयुक्त असल्याने कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन वेळत उपस्थितीत न राहिल्याने नागरीकांच्या अडीअडचणी वाढत गेल्या व संबंधित अधिकारी कर्मचारी सुसंवाद व मुलभूत सुविधा तक्रारीत वाढ झाली होती अखेर कार्यालयीन कामात सुसूत्रता व थकीत मालमत्ता कर, पाणी पट्टी कर वसुली साठी विशेष अभियान राबविण्या साठी पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी काढलेल्या आदेशानुसार पुर्ण वेळ म्हणून सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून बेग यांची नियुक्ती झाल्याने अनेक प्रलंबित प्रश्न व मालमत्ता कर, पाणी पट्टी वसुली थकबाकी मोठ्या प्रमाणात वसुली साठी दैनंदिन करनिरीक्षक , वसुली लिपीक यांच्या कढील थकबाकी मालमत्ता , पाणी पट्टी कर पोटी आढावा चालू असुन मालमत्ता कर वसुली मध्ये वाढ झाली आहे,तर तक्रारी ,प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.