हदगाव। तालुक्यातील मौजे तामसा येथील एका शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकतून काढलेले १ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३० रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरटे बँकेच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले, चोरट्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान तामसा पोलिसांच्या पुढे उभे आहे.
हदगाव तालुक्यातील कोपरा येथील शेतकरी भगवान सूर्यवंशी यांनी जेसीबीचे टायर खरेदीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून १ लाख रुपयांची रोकड उचलून एका पिशवित ठेवली. बँकेच्या काऊंटरवर दुसऱ्याशी बोलत उभा राहिला होता. शेजारच्या दोन युवकांनी भगवान सूर्यवंशी यांची पिशवी कापून त्यातील एक लाख रुपये रक्कम शिताफीने काढून तेथून निसटले. पिशवीचे वजन हलके झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. पिशवीत रक्कम नसल्याचे पाहून ते हादरले. बँकेत आरडाओरड झाली. बँकेचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता घडलेला सर्व प्रकार त्यात कैद झाला होता. दोघांचे
तामसा ग्रामीण बँकेत सुरक्षा गार्ड नाही. त्यामुळे पैसे भरणा व उचल करणारे किंवा अन्य कोणी आले का? यावर देखरेख करण्यासाठी कोणीही नसल्याने बँकेत कसल्याच प्रकाराची सुरक्षितता नाही. बँकेत सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. तसे वेळोवेळी कॅमेरे, फुटेज ऑपरेट करणे आवश्यक आहे. दर वेळी सीसीटिव्ही कॅमेरे ऑपरेट झाल्यास असे प्रकार घडत नाहीत. चोरी झाल्यावर सीसीटिव्ही फुटेज पाहणे ही गंभीर बाब असून बँकेने सुरक्षा ठेवणे गरजेचे आहे.
चेहरे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट कैद आहेत. शनिवारी आठवडी बाजार आणि क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मिरवणूक असल्यामुळे शहरात खूपच गर्दी होती. शोधाशोध केल्यानंतर शेतकरी भगवान सूर्यवंशी यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलीसांना सांगितला. पोलीसांनी बँकेचे सीसीटिव्ही फुटेज तपासले, मात्र सदर प्रकरणी तपास करून चोरट्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.