Hadgaon taamasa ; तामसा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून शेतकऱ्याचे एक लाख रुपये पळविले; चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद – NNL
हदगाव। तालुक्यातील मौजे तामसा येथील एका शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकतून काढलेले १ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३० रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरटे बँकेच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले, चोरट्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान तामसा पोलिसांच्या पुढे उभे आहे.
हदगाव तालुक्यातील कोपरा येथील शेतकरी भगवान सूर्यवंशी यांनी जेसीबीचे टायर खरेदीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून १ लाख रुपयांची रोकड उचलून एका पिशवित ठेवली. बँकेच्या काऊंटरवर दुसऱ्याशी बोलत उभा राहिला होता. शेजारच्या दोन युवकांनी भगवान सूर्यवंशी यांची पिशवी कापून त्यातील एक लाख रुपये रक्कम शिताफीने काढून तेथून निसटले. पिशवीचे वजन हलके झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. पिशवीत रक्कम नसल्याचे पाहून ते हादरले. बँकेत आरडाओरड झाली. बँकेचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता घडलेला सर्व प्रकार त्यात कैद झाला होता....
