CIDCO Regional Office ; अखेर मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ . मिर्झा बेग यांची नियुक्ती.. – NNL
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून अनेक अधिकारी नियुक्ती झाली मात्र नागरीकांच्या अडीअडचणी व प्रलबिंत कामांना गती देण्यासाठी, मालमत्ता कर, पाणी पट्टी थकबाकी वसुलीसाठी कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी डॉ. मिर्झा बेग यांची पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश काढले असून करनिरीक्षक सह वसुली लिपीक व्दारे दैनंदिन मालमत्ता, पाणी पट्टी करात वाढ झाली आहे.
नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी आयुक्त म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती अधिकारी यांनी या क्षेत्रीय कार्यालयचे काम पाहिले, 18 ऑक्टोबर रोजी डॉ. मिर्झा बेग यांनी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली,प्रभारी सहाय्यक आयुक्त असल्याने कर्मचारी व अध...
