नांदेड l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी सुरु झाली. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दुकानांना भेट देऊन दुकानमालक व ग्राहकांशी संवाद साधला.


सोमवारी दुपारी खा. अशोकराव चव्हाण यांनी दुकानांना भेट देत दुकानदार व ग्राहकांना पुष्प दिले. दुकानांच्या बाहेर जीएसटीचे दर कमी झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे स्टिकर्सही त्यांनी लावले. जीएसटीच्या दरकपातीबाबत नागरिकांना माहिती देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पंतप्रधानांनी जीएसटीच्या दरांमध्ये कपात करून १४० कोटी भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे. या दरकपातीमुळे प्रत्येक कुटुंबाच्या खर्चात बचत होणार असल्याची प्रतिक्रिया खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.


या उपक्रमात भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष व माजी आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, माजी महानगराध्य प्रवीण साले व दिलीप कंदकुर्ते, महामंत्री विजय येवनकर, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, महामंत्री विजय गंभीरे, महेश खोमणे, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, मनोज भंडारी, व्यंकट मोगले, माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, दुष्यंत सोनाळे, नागनाथ गड्डम, सुषमा थोरात, मंडळ अध्यक्ष आशिष नेरळकर व अमित वाघ, फारुखभाई, सोशल मीडिया प्रमुख राज यादव, गोपी मुदिराज, राज बियाणी, प्रदीप गिरी आदी उपस्थित होते.




