उस्माननगर, माणिक भिसे l शिका , संघटित व्हा , संघर्ष करा ,असा महामंत्र देणारे सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशी गर्जना करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी उस्माननगर परिसरातील विविध शाळेत ग्रामपंचायत कार्यालय सह अन्य ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठ ( खु) ता.कंधार येथे सकाळी शाळेच्या प्रांगणात बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या प्रतिमेसमोर स्कॅडल व पुष्पमाला अर्पण करून मुख्याध्यापक डी. गादेकर सह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मनोभावे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गादेकर , व सहशिक्षक ताटे , धुळशेट्टे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि संविधाना बद्दल प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले. यावेळी उदबुके , कांदे , सौ.कुलकर्णी ,

सौ मोधे , यांच्या सह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर सह अनेक महापुरुषांचा आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय लाठ (खु.) ता.कंधार येथील शासकीय कार्यालयात महामानव , विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. गंगाबाई पैलपार , उपसरपंच मनोज पाटील शिरसे , माजी उपसरपंच मनोज पाटील घोरबांड , ग्रामसेविका सौ. जयश्री घोरबांड , संजय जाधव , मारोतराव पाटील इंगोले , वसंतराव पाटील घोरबांड , शंकर बाबळे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक , उपस्थित होते.

सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत सकाळी प्रार्थना झाल्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनसळे , देविदास डांगे , भगवान राक्षसमारे , यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील शिक्षक मन्मथ केसे , श्रीमती सुशिला मॅडम , लाठकर सिध्दोधन , सौ. रोहिणी सोनकांबळे , शेख शकील यांच्या सह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. उस्माननगर परिसरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात महामानव विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमे समोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.