Usmannagar ; उस्माननगर परिसरात विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन – NNL
उस्माननगर, माणिक भिसे l शिका , संघटित व्हा , संघर्ष करा ,असा महामंत्र देणारे सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशी गर्जना करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी उस्माननगर परिसरातील विविध शाळेत ग्रामपंचायत कार्यालय सह अन्य ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठ ( खु) ता.कंधार येथे सकाळी शाळेच्या प्रांगणात बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या प्रतिमेसमोर स्कॅडल व पुष्पमाला अर्पण करून मुख्याध्यापक डी. गादेकर सह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मनोभावे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गादेकर , व सहशिक्षक ताटे , धुळशेट्टे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेड...
