नवीन नांदेडl भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त सिडको हडको येथे भारतीय बौध्द महासभा दक्षिण नांदेड व नंदीग्राम बुध्द विहार व्यवस्थापन समिती सिडको ,वंचित बहुजन आघाडी दक्षिण सिडको नांदेड च्या वतीने पणती ज्योती अभिवादन रॅली व अभिवादन सभा घेण्यात आली, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व भत्ते संघ प्रिय ,व उपस्थिती यांच्या हस्ते पणती ज्योत रॅली सुरूवात केली.
गेल्या 20 वर्षापासुन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे दि.६ डिसेंबर रोजी सिडको, हडको या शहरातील प्रमुख रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भव्य दिव्य अशा पणती ज्योत अभिवादन शांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,या रॅलीमध्ये सिडको, हडको या परीसरातील सर्व बौध्द उपासक, उपासिका यांनी पणती ज्योत सोबत घेवून मोठ्या संख्येने अभिवादन रॅलीमध्ये महिला युवक,युवती,जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
सदरील पणती ज्योत अभिवादन रॅली मार्ग नंदिग्राम बुध्द विहार संभाजी चौक येथून सुरुवात होऊन संभाजी चौक ते इंदिरा गांधी कॉलेज, विद्यादान कोचिंग क्लासेस,पंचशील बुध्द विहार,हडको येथून पंचशील चौक मुख्य रस्त्याने अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी चौक सिडको पासून ते डॉ. रायेवार यांच्या दवाखाना ते कुसूमताई शाळा ते गुरूवार बाजार रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे त्रिशरण पंचशील ग्रहण करून व अभिवादन सभेने समारोप करण्यात आला, यावेळी अमर रहे अमर रहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमर रहे,जब तक सुरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा या घोषणा देण्यात आल्या.
भन्ते संघप्रिय (कुशी बुध्द विहार, राहुलनगर, वाघाळा ,पी.एम.वाघमारे (जिल्हाध्यक्ष, भारतीय बौध्द महासभा) तर दीप प्रज्वलन प्रल्हाद जौधंळे,माजी नगरसेविका चित्राताई सिध्दार्थ गायकवाड ,राजु लांडगे, विठ्ठल गायकवाड, पि.एस.गवळे, भिमराव बेरजे ,नंदाताई वाघमारे, पार्वतीबाई हनुमंते,अशोक मगरे,प्रा.मधुकर गायकवाड,व्यंकट इंगळे,बि.आर. शिरसे,अमृत नरंगले,सम्राट अढाव, साहेबराव भंडारे,यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अभिवादन सभा प्रसंगी फारूक अहेमद यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
पणती ज्योत रॅली व अभिवादन सोहळयाला नंदीग्राम बुद्ध विहार,नाग लोक,नालंदा,त्रिरशरन,जेतवन, प्रबुद्ध,
दिक्षा,चंद्रमुनी,रमाई,पंचशिल,त्रिरतन, श्रावस्ती, विश्र्वशांती,कुशीनगर, सम्राट, सुभेदार रामजी आंबेडकर बूध्द विहार पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.