Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Dr manohar Rathod : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला सामोरे जावे – डॉ. मनोहर राठोड

Dr manohar Rathod : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला सामोरे जावे – डॉ. मनोहर राठोड

करियर, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| बोर्ड परीक्षांचा काळ जवळ येत असताना विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन गुरुकुल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ. मनोहर राठोड यांनी केले. ते शाळेत आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक स्थैर्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वर्षभर अभ्यासक्रमाचे नियोजनबद्ध अध्ययन केले असल्याने भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी तणावाखाली जातात. पेपर हातात आल्यावर घाबरून न जाता प्रश्नपत्रिका शांतपणे वाचावी, सोपे प्रश्न आधी सोडवावेत आणि वेळेचे योग्य नियोजन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. स्वतःवर व पालकांच्या संस्कारांवर विश्वास ठेवून धैर्याने परीक्षा द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिल...
12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, करियर
नांदेड l जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आल्याने पहिला पेपर सुरळीत पार पडला अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. पोलीस यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणत्याही परीक्षा केंद्रावर बाहेरून जमाव दिसून आला नाही. शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर झूम वेबकास्टद्वारे थेट निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर रूम) कार्यान्वित करण्...

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

नांदेड, करियर
नांदेड | नांदेड जिल्ह्यात दि. 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ थेट निरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची बारावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात राहणार असून झूम वेबकास्टच्या माध्यमातून परीक्षेतील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय महसूल विभागाचे विभागप्रमुख, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भरारी पथके जिल्हाभर कार्यरत राहणार आहेत. शिक्षण विभागाची सहा विशेष प...
12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर, नांदेड
नांदेड| जिल्ह्यात उद्या दि. 10 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून ही परीक्षा 112 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव अथवा भीती न बाळगता निर्भय व सुरक्षित वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. परीक्षेदरम्यान 100 टक्के कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात दि. 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, काही ठिकाणी बैठे पथक तैनात करण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शक, सुरळीत व शिस्तबद्ध पार पाडण्यासा...
Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

नांदेड, करियर, लातूर
कंधार, सचिन मोरे| उच्च माध्यमिक मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेला दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होत आहे. परीक्षा ऐन तोंडावर आल्या असताना मंडळाने शहरात दोन परीक्षा केंद्रावर ८९५ मुले- मुली परीक्षा देणार होते. त्यांना प्रवेशपत्र वाटपही करण्यात आली आहे. अशा वेळी लातूर विभागीय मंडळाने ५ फेब्रुवारीला एक आदेश परित करून कंधार शहरात तिसऱ्या परीक्षा केंद्राला मान्यता देऊन या केंद्रावर १६५ विद्यार्थ्याच्या परीक्षेची व्यवस्था केल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर १६५ विद्यार्थ्यांची धावपळ होणार असल्याचे चित्र कंधार शहरात निर्माण झाले असून या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. बारावी परीक्षेसाठी शहरात श्री शिवाजी कॉलेज नवरंगपूरा व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड कंधार असे दोन परीक्षा केंद्र आहेत....
Dr. Shrikant Patil : ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – डॉ. श्रीकांत पाटील

Dr. Shrikant Patil : ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – डॉ. श्रीकांत पाटील

करियर, नांदेड
नांदेड, प्रतिनिधी| ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी व उद्योजक यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून, स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात घेतलेल्या नव्या धोरणात्मक निर्णयांमुळे कृषी, ग्रामीण आणि डीप टेक क्षेत्रातील नवोपक्रमांना मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे आयोजित ‘प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. महेश कोकरे, विविध स्टार्टअप्सचे प्रतिनिधी, प्राध्यापक, उद्योग क्षेत...
Shivani news : बीएसएफ व सीआरपीएफमध्ये निवड झालेल्या जवानांचे नवयुवक मंडळाकडून जंगी स्वागत

Shivani news : बीएसएफ व सीआरपीएफमध्ये निवड झालेल्या जवानांचे नवयुवक मंडळाकडून जंगी स्वागत

नांदेड, करियर
शिवणी, भोजराज देशमुख | किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवणी गावाने देशसेवेसाठी दोन शूर जवान दिल्याने गावाचा नावलौकिक तालुका व जिल्हास्तरावर झळकला आहे. शिवणी येथील साईनाथ बेलयवार यांची सीमा सुरक्षा दलात (BSF) तर अजय धुमाळे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही जवानांनी आपले कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून पहिल्यांदाच जन्मगावी आगमन केल्याने, नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण शिवणी गाव देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेले होते. शिवणीसारख्या दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेत, जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमांच्या जोरावर साईनाथ बेलयवार व अजय धुमाळे यांनी हे यश संपादन क...
Awarded : युवा पत्रकार विजय वाठोरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर

Awarded : युवा पत्रकार विजय वाठोरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर

नांदेड, करियर
नांदेड | हिमायतनगर तालुक्यातील युवा पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले मौजे सरसम (बु.) येथील विजय नारायण वाठोरे यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद यांच्यातर्फे दिला जात असून, पुरस्काराचे निवडपत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी प्रदान केले आहे. हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गोर-गरीब, वंचित, शोषित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, प्रशासनावर जबाबदार दबाव ठेवत जनसामान्यांना न्याय मिळवून देणारे निडर पत्रकार म्हणून विजय वाठोरे यांची ओळख आहे. त्यांच्या लेखणीतून सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविण्यात आला असून, त्यामुळे तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर...
उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

नांदेड, करियर
नवीन नांदेड l ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गंभीर गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. हा गौरव सोहळा दि. ३१ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पार पडला. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांनी विविध गंभीर गुन्ह्यांत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ग्रामीण गु.र.नं. ११९०/२०२५, कलम ३/२५, ७/२५ भा.ह.का. अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. याचबरोबर पुणे शहरात खून करून फरार झालेले आणि नांदेड ग्रामीण हद्दीत दबा धरून बसलेले दोन पाहिजे आरोपी उपनिरीक्ष...
Nanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा इतिहास

Nanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा इतिहास

करियर, नांदेड
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सिकंदराबाद येथील न्यू भोईगुडा, रेल कलारंग येथे आयोजित 70 व्या रेल्वे सप्ताह समारंभात उल्लेखनीय कामगिरी करत एकूण चार प्रतिष्ठेचे कार्यक्षमता शिल्ड्स पटकावून विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला (The Nanded division) आहे. नांदेड विभागाने ब्रिजेस (पूल) आणि रेल मदत (Rail Madad) या दोन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत स्वतंत्र शिल्ड्स मिळवले. तसेच, समपातळी क्रॉसिंग निर्मूलन या श्रेणीत गुंतकल विभागासोबत संयुक्त शिल्ड आणि सर्वोत्तम देखभाल केलेल्या वैद्यकीय मदत व्हॅन (MRV) साठी विजयवाडा विभागासोबत संयुक्त शिल्ड प्राप्त केली. त्यामुळे एकूण चार प्रमुख कार्यक्षमता शिल्ड्स नांदेड विभागाच्या खात्यात जमा झाल्या आहेत. या समारंभात वैयक्तिक उत्कृष्टतेचीही दखल घेत, उल्लेखनीय योगदानाबद्दल एका अधिकाऱ्यास व सात कर्मचाऱ्यांना “विशिष्ट रेल सेवा ...
error: Content is protected !!