सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

NNL Team
3 Min Read

 कंधार, सचिन मोरे l सार्वजनिक शिव जन्ममहोत्सवा निमित्त भवानीनगर कंधार येथील बालाजी मंदिरात आयोजित सार्वजनिक शिवजन्म महोत्सव २०२६ अंतर्गत पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वप्नभूमी नगर, कंधार येथील श्रीमती गंगाबाई बालक मंदिर व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकत सांस्कृतिक क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवत स्पर्धेचे तृतीय पारितोषिक पटकाविले आहे.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, कंधारतर्फे बालाजी मंदिर, भवानीनगर, कंधार येथे चिमुकल्यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्ष शहाजी नळगे हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, नगरसेवक मयुर नळदकर, महेश पिनाटे, दिलीप देशमुख, नगरसेवक प्रतिनिधी चेतनभाऊ केंद्रे, प्रकाश घोरबांड, मधुकर डांगे, निलेश गौर आदी मान्यवर उपस्थित होते.

IMG 20260219 WA0004 सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

श्रीमती गंगाबाई बालक मंदिर व प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी ते सातवीतील ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरोही तोंडचिरे, श्रेया लाडेकर, नंदिनी नागरगोजे, साक्षी पवार, जानवी कांबळे, ज्योती राठोड, मायावती जाधव, काजल लाडेकर, मेनका जाधव व श्रेया जायभाये या चिमुकल्यांनी ‘आले मराठे ’ व ‘गोंधळ’ या गीतांवर सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. ताल, लय आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम साधत त्यांनी रंगमंच गाजवला. पारंपरिक वेशभूषा आणि सुसंवादित हालचालींमुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

IMG 20260219 WA0003 सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

तसेच इयत्ता सहावी व सातवीतील योगीराज टोकलवाड, कृष्णा गोटमवाड, युवराज जाधव, नैतिक जाधव, अविनाश कांबळे, गणेश गायकवाड, करण राठोड व विशाल चव्हाण या विद्यार्थ्यांनी नवीन्यपूर्ण ‘बोना डान्स’ सादर करून कार्यक्रमात वेगळेपणा आणला. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन झाले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त दाद देण्यात आली.

IMG 20260219 WA0002 सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते सातवी या लहान गटात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर इयत्ता आठवी ते बारावी या मोठ्या गटात ४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गाण्यांवर विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी गंगाधर तोगरे, तुकाराम कारागिर, शंतनु कैलासे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव सार्वजनिक सोहळा समितीचे अध्यक्ष विनोद तोरणे, कंटिराम लुंगारे, संतोष बोरगावे, राजहंस शहापुरे, परमेश्वर जाधव, रमेश लुंगारे, संदीप तोंडचिरे, व्यंकटराव नागलवाड, बालाजी डफडे, ॲड. कुट्टे, नितीन कोकाटे, संभाजी लाडेकर, त्रिभुवन मोरे, रमेश लुंगारे, संतोष बोरगावे, शिवा तोंडचिरे, अविनाश गित्ते, दिलीप कांबळे, विकास गारोळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन परशुराम कौसल्ये यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!